Golden opportunity for farmers in Vidarbha to increase milk production : शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याचे गडकरींचे आवाहन
Nagpur एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात ८० लाख लिटर दुधाचे उत्पादन होते आणि अख्खा विदर्भ मिळून पाच लाख लिटरपर्यंत पोहोचतो. ही परिस्थिती बदलावी लागेल. कोल्हापूरला शक्य आहे तर विदर्भाला का नाही याचाही विचार करावा लागेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
मराठवऱ्हाड दुग्ध उत्पादक संघटनेचा शुभारंभ तसेच धारा खाद्य तेल पॅकिंग केंद्राचे भूमिपूजन तसेच मदर डेअरीच्या Mother Dairy बुटीबोरी स्थित मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टच्या कामाचा शुभारंभ गडकरींच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मदर डेअरी प्रकल्पाच्या निमित्ताने विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
Dr. Pankaj Bhoyar : आशा सेविकांनाही मिळणार टॅब, Technosavy करणार
गडकरी म्हणाले, ‘विदर्भातील मुख्य पिकांची अवस्था वाईट आहे. वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यांना शेतकरी आत्महत्यांनी ग्रासले. दुसरीकडे गडचिरोलीला नक्षल चळवळीने ग्रासल्यामुळे तेथील विकासाला खीळ बसली होती. मात्र, मदर डेअरीसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केला आणि योजना तयार केली. त्यानंतर मदर डेअरीने सुरू केलेले काम दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.’
‘विदर्भात हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थानातून गायी आणल्या जात आहेत. अशाने स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मदर डेअरीशी जुळलेल्या ३५ हजार शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. यांच्यापैकी प्रत्येकाने पाच चांगल्या गायी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्या तर दूध उत्पादन वाढेल. स्थानिक लोकांनी जास्त दूध देणाऱ्या गायी तयार केल्या तर त्याचा विदर्भातील शेतकऱ्यांनाच फायदा होईल,’ असेही ते म्हणाले.
मदर डेअरीच्या मार्फत नागपूर येथील सुप्रसिद्ध अशा संत्रा बर्फीचे देखील मार्केटिंग होणे आवश्यक आहे. ही बर्फी शुद्ध संत्र्याचा पल्पपासूनच तयार केली जाईल. त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.