Pankajatai overwhelmed by Baramati’s development : म्हणाल्या, ‘उपमुख्यमंत्र्यांकडून खूप काही शिकण्यासारखे’
Baramati अजितदादा सकाळी सहापासून काम सुरू करतात, याचा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला आहे. त्या बारामतीचा विकास बघून भारावल्या आहेत. बुधवारी त्यांनी बारामतीला भेट दिली तेव्हा ‘उपमुख्यमंत्र्यांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे’, अशी उत्स्फूर्त भावनाही व्यक्त केली.
विविध विकासकामांच्या उद्घाटनांसाठी पंकजा मुंडे बारामतीत होत्या. त्यावेळी त्यांनी बारामतीतील विकासकामांची पाहणी केली. बारामती शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या अक्षरशः भारावून गेल्या. बारामतीच्या प्रत्येक विकास कामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. दादांच्या व्यक्तिमत्त्वातील काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, झपाटून काम करण्याची पद्धत यासह खूप काही गोष्टी अजितदादांकडून शिकण्यासारख्या असल्याचे त्या म्हणाल्या.
National Startup Day : स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद
प्रत्येक कामावर लक्ष
बारामतीच्या विकासाबद्दल भरभरून बोलताना त्या म्हणाल्या, ‘एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीतून बारामती बघण्याचा आज योग आला. बारामती मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, त्यांचा दर्जा हा अत्यंत सुंदर आहे. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांचा दिवस पहाटे सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे. काटेकोरपणा, वक्तशीरपणा यांसह उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.’
Sports director of Wardha: मानधनात अनियमितता; ‘खेलो इंडिया’चा ‘खेला’!
अजितदादांचं विकासाशी नातं
बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.