Breaking

Pardhi Community : अखेर पारधी समाजाच्या घरकुलाचा प्रश्न सुटला

About 5 acres of land in the forest department is available for housing : वन विभागातील जवळपास ५ एकर जमीन घरकुलांसाठी उपलब्ध

Buldhana स्थानिक अंढेरा येथील पारधी समाजाच्या घरकुलाचा २५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार मनोज कायंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या निर्णयामुळे वन विभागातील जवळपास ५ एकर जमीन घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अंढेरा येथील शेकडो आदिवासी कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अंढेरा येथील पारधी समाजाची लोकसंख्या सुमारे एक हजारांहून अधिक असून, ही वस्ती वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता. अनेक वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नव्हता. अखेर भगवानराव मुंढे आणि प्रा. दिलीप सानप यांनी ही समस्या आमदार कायंदे यांच्या निदर्शनास आणून दिली.

MSRTC : एसटीच्या सवलतींचा प्रवाशांना मोठा लाभ; पण महामंडळाचे कंबरडे मोडले

मागील महिन्यात पालकमंत्री पाटील जिल्हा दौऱ्यावर असताना, आमदार कायंदे यांनी अंढेरातील पारधी समाजाच्या घरकुल प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यानंतर ना. पाटील यांनी स्वतः अंढेरातील पारधी वस्तीला भेट देऊन पाहणी केली आणि “कायदेशीर प्रक्रियेला बगल देत, तातडीने जागा उपलब्ध करून द्या,” असा स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

codeofconduct : हुंड्याऐवजी मुलीसाठी फिक्स डिपॉझिट, फाजील खर्चाला फाटा

१ ऑगस्ट रोजी महसूल दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकृत मंजुरी आदेशाची प्रत भगवानराव मुंढे, प्रा. सानप, सुनील पवार, मल्हारी भोसले आणि गावकऱ्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. घरकुलांसाठी सरकारी हद्दीतील गट क्र. १३ मधील १ हे. ८१ आर. जमीन निश्चित करण्यात आली असून त्यावर आता गृहबांधणी होणार आहे. या निर्णयामुळे पारधी समाजात आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील आणि आमदार मनोज कायंदे यांचे विशेष आभार मानले.