Bachchu will listen bitterly, Chandrashekhar Bawankule believes : अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या पृष्ठभूमिवर आंदोलन मागे घ्यावं
Nagpur : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे उपोषण गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही त्यांच्या संपर्कात आहो. त्यांच्या मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रधान सचिवांनी बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा केली आहे. मी सुद्धा आज (ता. १३ जून) बच्चू कडू यांना भेटायला जाणार आहे. पण गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान अपघाताच्या पृष्ठभूमिवर बच्चू कडूंनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं आणि ते आमचं ऐकतील, असा विश्वास आहे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
यासंदर्भात नागपुरात आज पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, प्रशासनाने एटीआर रिपोर्ट बच्चू कडू यांना दिला आहे. त्यांच्या काही मागण्या धोरणात्मक आहेत. मंत्रीमंडळासोबत चर्चा करून त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी आर्थिक तरतुदी कराव्या लागतील, बजेटमध्ये त्या बाबी घ्याव्या लागतील. त्यानंतरच त्यावर निर्णय होऊ शकतो. अहमदाबाद येथे झालेल्या विमान आपघातानंतर देशभर हळहळ आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घ्यावं, अशी त्यांना आमची विनंती आहे.
Maharashtra Politics : संजय शिरसाट म्हणतात ‘उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर भेटायला नक्की जाईन’
राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री संजय राठोड बच्चू कडू यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी गेले होते. तेथे त्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. यावर प्रश्न विचारला असता मंत्री जर उपोषणाच्या ठिकाणी जात असतील आणि त्यांच्या निवेदनावर सरकार विचार करणार असेल, तर त्यांनी शासनाचे म्हणणे ऐकून चर्चा केली पाहिजे. मंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी करून अशा पद्धतीची वागणूक देऊ नये, अशी कार्यकर्त्यांना विनंती आहे, असे ते म्हणाले.
अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात विचारले असता, अपघातानंतर जी काही परिस्थिती उद्भवली, त्यावर सरकार लक्ष ठेऊन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथे जाऊन आले आहेत. सरकारकडून जे प्रयत्न केले पाहिजे, ते केले जात आहेत. ही टिका टिप्पणी करण्याची वेळ नाही. संपूर्ण चौकशी झाल्यावर त्यावर बोललं पाहिजे. अशा परिस्थितीत विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारण्यापेक्षा दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.