Akola Pattern of Ambedkari movement in book form : पुस्तकातून मांडला जाणार इतिहास
Akola आंबेडकरी चळवळीचा ‘अकोला पॅटर्न’ (१९२० ते २०२४) हा १०५ वर्षांचा इतिहास आता पुस्तकातून मांडला जाणार आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीचा लेखाजोखा या पुस्तकातून मांडला आहे. अकोला पॅटर्न, बहुजन महासंघ, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीपर्यंतचा प्रवास यामध्ये उलगडला जाणार आहे.
आंबेडकरी चळवळीचा इतिहास आहे तसा नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. याचाच विचार करून १९८० ते २०२१ या काळातील सर्व घडामोडींचा आढावा या पुस्तकात घेतला जाणार आहे. ‘भारिप ते वंचित – १९८० ते २०२१’ हा काळ प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय जीवनातील ‘अकोला पॅटर्न’ म्हणून राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहे. ‘अकोला पॅटर्न’ हा १९९२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीतील भारिप आणि बहुजन महासंघाच्या विजयापुरता मर्यादित नाही. ही चळवळ १९२० पासून राजकीय, सामाजिक पातळीवर सुरू आहे.
Panchayat Samiti sabhapati : नवा गडी नवा राज, सोडत निघताच नावांची चर्चा सुरू !
१९२० ते २०२४ या काळातील वेगवेगळ्या पातळीवर झालेल्या आंबेडकरी चळवळीचा एक समान धागा आहे. अकोला जिल्ह्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पातळीवर प्रचंड घडामोडी घडल्या. हे शब्दबद्ध करणे, मोठा डेटा गोळा करणे, त्यातील नेमके सत्य तपासून त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आंबेडकरी चळवळीतील एक नेते म्हणून राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. लवकरच तो पुस्तक स्वरुपात वाचकांच्या समोर येणार आहे.
१९२० ते २०२५ या कालावधीत मोठ्या प्रेरणादायी घटना अकोल्यात घडल्या आहेत. त्याचे पडसाद देशभर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर पडले आहेत. अकोला जिल्हा हा सातत्याने अश्या घटनांचा केंद्र बिंदू राहिला आहे.
खरा इतिहास मांडणार
‘अकोला पॅटर्न’चा उदय १९८४ साली झाला, असं अनेक लोक म्हणतात. पण हे विश्लेषण अर्धवट आहे. ‘अकोला पॅटर्न’ हा स्वातंत्र्यपूर्व काळातच अस्तित्वात आला. तो मांडण्याचा प्रयत्न झालाच नाही. ज्यांनी लिहले त्यांनी दलित चळवळ म्हणून मर्यादित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढत असलेला सर्वहारा समूह हा स्वातंत्र लढ्यात देखील सहभागी होता. हा करा इतिहास अकोला पॅटर्नचा असन तो पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.