Breaking

Prataprao Jadhav : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची देशभरात भरीव कामगिरी !

The role of education is important in empowering the country and society : देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची

Education News : देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविणारे शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

बेंगळुरु येथे आयोजित “श्री.श्री. एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५” या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री.श्री. रविशंकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी मंत्री जाधव यांनी संबोधित केले.

Pratap Sarnaik : उद्यापासून राज्यभरात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान !

शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित
प्रतापराव जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आधार आहे. शिक्षक व शिक्षणसंस्था समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील राहाव्यात. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी आपल्या कार्यातून समाजात परिवर्तन घडवून आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.

देश का प्रकृती अभियान
देशभरात २६ नोव्हेंबर २०२४ ते २५ डिसेंबर २०२४ दरम्यान राबविण्यात आलेल्या “देश का प्रकृती अभियान” याचा उल्लेख त्यांनी केला. या अभियानाद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक माहिती पुरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेची प्रशंसा
श्री.श्री. रविशंकर यांच्या नेतृत्वाखाली आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने देशभरात तणावमुक्ती, जनजागृती आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे. जागतिक दर्जाच्या तणावमुक्त आणि मूल्याधारित शिक्षणामुळे संस्थेचे कौतुक केले.

Animea prevention : बाय बाय अॅनिमिया! आजार रोखण्यासाठी देशभर फिरणार बस

शिक्षणाच्या विकासावर भर
विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, आणि नैतिक विकासावर भर दिला पाहिजे, असे सांगून शिक्षण हा समाजाच्या प्रगतीसाठी एक मजबूत पाया असल्याचे प्रतिपादन प्रतापराव जाधव यांनी केले. या सोहळ्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री.श्री. रविशंकर यांच्यासह विविध मान्यवर, शिक्षक आणि पुरस्कारप्राप्त व्यक्ती उपस्थित होते.