The defeated candidates in the assembly together on cricket pitch : गोरेगाव क्रिकेट स्पर्धेत रंगला सामना बघायला गर्दी
Buldhana विधानसभेच्या सिंदखेड राजा मतदारसंघात पराभूत झालेल्या दोन दिग्गज नेत्यांचा सामना एका पिचवर पाहायला मिळाला. निमित्त होते १० फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या खुल्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे मैदानावर स्पर्धेची सुरुवात झाली.
स्पर्धेचे उद्घाटन विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते झाले. तर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर अध्यक्षस्थानी होते. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना दोन माजी आमदारांच्या बॅटिंग आणि बॉलिंगचा थरार पाहायला मिळाला.
Local Body Elections : राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोइंग वाढले
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यात सरळ लढत होईल. असे वाटत असतानाच अजित पवार यांनी मनोज कायंदे यांना रिंगणात उतरवले. मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते कार्यरत झाले. तर पराभूत दोन्ही माजी आमदार क्रिकेटच्या मैदानावर दिसले. मोहाडी येथे नुकतेच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. आणि १० फेब्रुवारीला गोरेगाव येथे स्पर्धेला प्रारंभ झाला.
Uday Samant : ..तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं योग्य नाही !
विशेष बाब म्हणजे, याच गोरेगावमध्ये डॉ. शशिकांत खेडेकर यांना विधानसभा निवडणुकीत प्रचंड आघाडी मिळाली होती. त्यामुळे राजकारणात पराभूत झालेले नेते आता मैदानावर एकत्र आले आहेत. राजकारणातील तणाव सोडून खेळाचा आनंद घेत असल्याचे चित्र हाेते. दाेन्ही दिग्गज नेते एकाच कार्यक्रमात आल्याने चांगलीच चर्चा रंगली हाेती. त्यांचे मनाेमिलन झाले की काय असा प्रश्न आता दाेन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पडत आहे.