Women tie black Rakhis to protest farmer suicides : शेंदुरजना येथील घटनेने वेधले देशाचे लक्ष; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे मुखवटे
Washim मानोरा (जि. वाशिम) कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि धानाला बोनस देण्याच्या मागण्यांसाठी मानोरा तालुक्यातील शेंदुरजना येथे शेतकरी, शेतमजूर आणि महिलांनी अनोखे आंदोलन केले. रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुखवटे लावलेल्या प्रहार कार्यकर्त्यांना काळी राखी बांधून राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांचा निषेध नोंदविण्यात आला.
धान रोवणी करणाऱ्या आणि गावातील महिलांनी शेतातच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या मुखवटे घातलेल्या व्यक्तींना ओवाळणी घालत काळी राखी बांधली. यावेळी “कर्जमाफी द्या, शेतमालाला हमीभाव द्या, धानाला बोनस द्या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करून निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळावीत, अशी मागणीही करण्यात आली.
Ravi Rana : नवनीत राणांच्या हत्येच्या कटात ८ ते १० जणांचा सहभाग
अलीकडेच प्रहारचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी, कर्जमाफीसह दिव्यांग व शेतकऱ्यांच्या १७ मागण्यांसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना प्रतिकात्मक काळ्या राख्या बांधून निषेध करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मानोरा तालुक्यातील या आंदोलनाचे पडसाद उमटले.
Shiva Iyer : पुढील पंतप्रधान मराठी माणूसच हवा, शिवा अय्यर यांचा आग्रह
या आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे माजी तालुका प्रमुख शाम पवार आणि तडफदार प्रहार सेवक चेतन पवार यांनी केले. ग्रामपंचायत शेंदुरजना येथे झालेल्या या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुरू असलेल्या शेतातच हे अभिनव आंदोलन करून शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.