Breaking

Ram Sutar : राम सुतार शिल्पकलेच्या क्षेत्रातील भीष्माचार्य !

 

Ajit Pawar and Eknath Shinde congratulated Ram Sutar : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

Mumbai : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला. राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचं प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला.

या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहचवले. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दादरला चैत्यभूमी येथे उभारण्यात येत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे त्यांच्या कलाकौशल्याप्रमाणेच या महामानवांवरील त्यांच्या प्रेमाचे, आदराचे प्रतिक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांचा गौरव केला. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील या दीपस्तंभाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

Sangram Kote Patil : संग्राम कोते पाटलांना डावलल्यामुळे राष्ट्रवादीमधील युवा दुखावला का ?

शिल्पकलेत महाराष्ट्राचे नाव जगात मोठे केले..
भारतातील सर्वात वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि कला तपस्वी शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सन्मान्य पुरस्कार आम्ही जाहीर केल्यानं या पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सुतार यांचे अभिनंदन केले.

जगातील सर्वात उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा निर्माण करून देशाच्या अस्मिताचिन्हाचा यथोचित गौरव करणारे राम सुतार हे शिल्पकलेच्या क्षेत्रातील भीष्माचार्य आहेत. आपली सारी कला आणि सर्जनशीलता भारतीय संस्कृती आणि परंपरांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी समर्पित करणाऱ्या कलामहर्षी सुतार यांचे या पुरस्कारासाठी मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या कलासाधनेला शतशः प्रणाम.

Eknath Shinde : हिमाचल आणि जम्मू-काश्मीरचा उबाठाला जय महाराष्ट्र !

कलेच्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या शिल्पकलेने महाराष्ट्राचे नाव जगात मोठे केले, असे गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, वयाची शंभरी गाठली असूनही मातीतून अक्षरशः जिवंत वाटावीत अशी शिल्पं निर्माण करणारे राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024 देण्याचा निर्णय आम्ही घेतला. समर्पण, कामाविषयी निष्ठा, मेहनत आणि आभाळाइतकी उंची गाठण्याची जिद्द हाच राम सुतार यांच्या यशाचा मंत्र आहे. पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांचे काम प्रेरणा देत राहील, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा देतांना सांगितले.

Ajit Pawar Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या टार्गेटवर एकनाथ शिंदेंचा विभाग !

गेल्या वर्षीच आम्ही मालवण येथे छत्रपती शिवरायांचा भव्य आणि सुंदर असा पुतळा साकारण्याची जबाबदारी राम सुतारांवर सोपविली. मी स्वतः देखील राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव आणि सुतार यांच्याशी त्यावेळी बोललो. मला खात्री आहे की हा पुतळा करोडो शिवप्रेमींना प्रेरणा देणारा ठरेल. दिल्लीत संसद भवन, राष्ट्रपती भवन अशा महत्त्वाच्या ठिकाणी राम सुतार यांनी उभारलेले महनीय व्यक्तींचे आणि महापुरुषांचे पुतळे हे केवळ लोकप्रिय झालेले नाहीत तर तर ही शिल्पकला बघून जगातील नामवंत शिल्पकारांनी समाधान व्यक्त केलं आहे. राम सुतार यांचा सन्मान करून आम्ही देशातल्या सगळ्या चांगल्या शिल्पकारांचा एकप्रकारे गौरव केला आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.