Minister Bhuses backlash sparks factionalism : मंत्री भुसे यांची पाठ वळताच गटबाजीचा उद्रेक
Gadchiroli : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गटबाजी पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर शिंदे गटातील शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख एकमेकांवर भिडल्याची घटना घडली आहे. सर्किट हाऊसमध्ये थेट श्रेयवादावरून वाद वाढत गोंधळ आणि मारहाणीपर्यंत पोहोचला.
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सर्किट हाऊसमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर ते चंद्रपूरकडे रवाना होताच, शिंदे गटातील जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर (गडचिरोली) आणि राकेश बेलसरे (अहेरी) यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये श्रेयवादावरून शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या वादामुळे उपस्थित शिवसेना पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्यात गोंधळ उडाला. उपस्थित लोकांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
Anil Deshmukh : भांडण विकोपाला गेलं की ‘ते’ दिल्लीत जातात, नंतर…
या प्रकारामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, येणाऱ्या स्थानिक निवडणुकांपूर्वी अशा घटनांमुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान याच दिवशी सकाळी सहा वाजता गडचिरोली-नागपूर मार्गावरील काटली गावात एक अपघात झाला. व्यायामासाठी गेलेल्या सहा तरुणांवर भरधाव ट्रकने धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दोघांना नागपूरला हलवण्यात आलं आहे.
Dispute in Mahayuti : भाजप आमदार शिंदेंच्या आमदारांवर तुटून पडले !
या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी तब्बल पाच तास नागपूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली. मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनासह ग्रामस्थांची समजूत काढली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
________