Breaking

Shweta Mahale : बुलढाण्यातही आमदारांच्या घरापुढे पेटवले टेंभे!

Protest in front of MLA’s house in Buldhana too : निवासस्थानासमोर आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना रोखले

Buldhana शेतकरी आणि जनसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने गुरुवारी रात्री चिखली, मलकापूर, खामगाव आणि जळगाव जामोद येथे सत्ताधारी आमदारांच्या निवासस्थानासमोर “टेंभे आंदोलन” छेडले. मात्र पोलिसांनी काही ठिकाणी आंदोलकांना अडवले, अटकेत घेतले, तर काही ठिकाणी घराघरांमधून शोध घेऊन आंदोलक ताब्यात घेतले.

चिखली येथे आमदार श्वेता महाले यांच्या घराजवळ आंदोलन करण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. आंदोलकांना पहाटे चारपर्यंत पोलीस ठाण्यात थांबवण्यात आले.

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची ‘चलो बोधगया’ हाक!

जळगाव जामोद येथे आमदार संजय कुटे यांच्या घरासमोर टेंभे पेटवत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. आमदारांचे स्वीय सहाय्यक राऊत यांच्याशी वादही उफाळला. मलकापूर येथे आमदार चैनसुख संचेती यांनी स्वतः बाहेर येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. खामगावमध्ये मात्र आंदोलक घरोघरी शोधून पोलिसांनी ताब्यात घेतले.

जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात चिखली तालुकाप्रमुख सुनील वाघ, बुलढाणा तालुकाप्रमुख गणेश काकडे, सोनू वाघ, अनंत उबाळे, विष्णू घाडगे, सचिन नेमाने, अरविंद गुजर, पिंटू गुजर, गणेश जाधव, अजय शिंदे, विकी सरोदे, नीलश चिंचोले, पवन बामदळे, आकाश जाधव, दिलीप उबाळे, स्वप्निल नेमाने, नितिन इंगळे, सुनील शिंदे, राजू ढोले, आशिष तोटे यांनी सहभाग घेतला.

Nitin Gadkari : गडकरींचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, प्रश्नच मार्गी लागला!

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेत, दिव्यांगांना मासिक ६,००० रुपये मानधन, शेतमालाला हमीभाव आदी मागण्यांसाठी हे आंदाेलन करण्यात आले. “दडपशाही केली तरी जनहितासाठी उग्र आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा वैभवराजे मोहिते यांनी दिला.