Six people injured in freak accident : समृद्धी महामार्गावरील विचित्र अपघातात सहा जण जखमी
Wardha नादुरुस्त स्थितीत सिमेंट भरुन असलेल्या ट्रकला मागाहून येणारी कार धडकली. पाहता पाहता काही वेळात मागाहून येणारी दुसरी कारही त्या कारला धडकली. या विचित्र अपघातात दोन्ही कारमधील सहा जण जखमी झाले. हा अपघात जाम ते नागपूर समृद्धी महामार्गावर जसापूर शिवारात मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास झाला.
या अपघातात एपी. २८ डीजे. ७३९८ क्रमांकाच्या कारमधील सात प्रवाशांपैकी आदित्य राज (२०), कल्पना कटरला (२०),रिशिका (२२) सर्व रा. हैदराबाद हे गंभीर जखमी झाले. तसेच दुसऱ्या एमएच. २२ एच. ४६८७ क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधील एकूण १२ प्रवाशांपैकी नरसिंह मल (४०), अमरनाथ रेड्डी (५०) दोन्ही रा. जहीराबाद तेलंगणा आणि गणेश अभंग सुरवशे (४२) हे किरकोळ जखमी झालेत.
Nagpur Municipal Corporation : मोबाईल कंपन्यांमुळे नागपूर मनपा अडचणीत
एमएच. ३४ बीजी. ८८५० क्रमांकाच्या ट्रक चालक मोहम्मद अखिल मोहम्मद लल्लू (२१ रा. पडोली चंद्रपूर) हा ट्रकमध्ये सिमेंट भरुन चंद्रपूर ते नागपूर समृद्धी महामार्गाने जात होता. जसापूर शिवारात ब्रेक डाऊन झाल्याने ट्रक फर्स्ट लेनवर नादुरुस्त स्थितीत उभा होता. हैदराबाद ते प्रयागराज जात असलेली एपी. २८ डीजे. ७३९८ क्रमांकाऱ्या कार चालकाला समोरील वाहन दिसून न आल्याने कार थेट नादुरुस्त स्थितीत असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली.
काही वेळाने मागाहून येणाऱ्या एमएच. २२ एच. ४६८७ क्रमांकाचे वाहन प्रयागराज जात असतानाच कार निष्काळजीपणे चालवून अपघातग्रस्त कारवर जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळ गाठून हायवे रुग्णवाहिकेने जखमींना समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ नेले.
Chandrashekhar Bawankule : मल्लिकार्जुन खरगेंचा निर्बुद्ध, पण तेवढाच संतापजनक प्रश्न !
पोलिस निरीक्षक संतोष सपाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक भय्याजी ताेडसे, विकास काकडे, रंजीत फाले, प्रदीप डोंगरे, यांनी वाहतूक वळवून अपघातग्रस्त वाहने हायड्राच्या सह्याने सुरक्षित ठिकाणी हलवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.