Breaking

ST bus driven : फुकटच्या प्रसिद्धीसाठी वणीच्या आमदारांनी चालवली एसटी, माजी आमदारांची तक्रार !

Wani’s BJP’s Former MLA Sanjeevreddi Bodkurwar complain about irresponsibility of Shiv Sena MLA Sanjay Derkar : विनापरवाना सार्वजनिक जड वाहन चालवणे धोक्याचे

Chandrapur : हल्ली काही लोकप्रतिनिधी केवळ प्रसिद्धीसाठी काहीही करताना दिसतात. गेल्या वर्षी एका खासदार महोदयांनी कारच्या बोनेटवर बसून स्टंट केला होता. तर कुणी जेसीबीवर बसून पुरपरिस्थितीची पाहणी करताना यापूर्वी पाहण्यात आले आहे. आता यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे आमदार संजय देरकर यांनी कुठलाही अनुभव आणि परवाना नसताना एसटी बस चालवण्याचा प्रताप केला आहे.

वणी आगाराला पाच नवीन बसेस मिळाल्या. त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार महोदयांना निमंत्रण गेले. आमदार संजय देरकर लोकार्पण सोहळ्याला आले. या लोकार्पण कार्यक्रमातून प्रसिद्धी कशी मिळवता येईल, याचा विचार कदाचित त्यांच्या डोक्यात तेव्हा सुरू असावा. मग त्यांनी लोकार्पणासाठी सजवलेली बस वणी शहरातून चालवली. याची प्रसिद्धी तर त्यांना मिळाली. पण माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी त्यांची तक्रार एसटी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे केली.

Municipal corporation elections : विदर्भात भाजप – काँग्रेसमध्ये थेट लढत!

आमदार संजय देरकर यांच्याकडे बस चालवण्याचा कुठलाही अनुभव नाही. तसेच परवाना आणि बॅजसुद्धा नाही. अशा परिस्थितीत त्यांनी वणी शहराच्या रस्त्यांवर बस चालवणे किती धोकादायक आहे, हे कुणीही सांगू शकेल. आगाराच्या अधिकाऱ्यांनीच त्यांना मज्जाव करायला हवा होता. पण त्यांचाही कदाचित नाईलाज झाला असावा. अपघात होऊन काही नुकसान झाले असते तर जबाबदारी कुणाची? आगार व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांची की आमदारांची, असे प्रश्न माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थित केले आहेत.

Ravi Rana : राणांचा इशारा, पालकमंत्र्यांच्या बैठकीत दोन-चार जणांना निलंबितच करतो

सार्वजनिक वापराचे सरकारी वाहन विनापरवाना चालवणे, ही गंभीर बाब आहे. एसटी महामंडळाने संबंधित सर्व दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.