convoy towards Mumbai, Aoppose continues, state president is unaware : मोठा ताफा मुंबईकडे,आ. हिरेंचा विरोध कायम, प्रदेशाध्यक्षही अनभिज्ञ
Nashik: शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर आज भाजपात, पक्षप्रवेश करणार आहेत असे संगीतले जात आहे. त्यासाठी त्यांचा ताफा मुंबईकडे निघाला आहे. मात्र त्यांच्या प्रवेशावरून भाजप मध्ये गोंधळ पहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्षांनी या बाबत कानावर हात ठेवले आहेत. तर दुसरीकडे स्थानिक आ. सीमा हिरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बडगुजरांच्या प्रवेशाला मोठा विरोध आज पण दिसून येत आहे.
नाशिकच्या राजकारणात आज मोठा फेरबदल घडणार आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध असताना त्यांच्यासह बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील डझनभर माजी पदाधिकारी आणि नगरसेवक पण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत.
BJP Politics : बडगुजरांचा ताफा मुंबईकडे रवाना, प्रवेश होणार की अडवला जाणार? संभ्रम कायम !
बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षप्रवेशापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केले. ‘आता सुरुवात आहे. सर्व सहकारी येतात. सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही रवाना होऊ, भरपूर लोक आहेत. लवकरच चित्र स्पष्ट होईल,’ अशी प्रतिक्रिया बडगुजर यांनी मुंबईकडे निघण्यापूर्वी दिली. भाजपच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. गिरीश महाजन आणि भाजपचे सर्व वरिष्ठ नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे.
Eknath Shinde Shiv Sena : विदर्भातील शिंदेसेनेत असंतोष; नियुक्त्यांवरील वाद चिघळला
भाजपच्या स्थानिक आ. सीमा हिरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यां कडून या प्रवेशाला विरोध होता. परंतु पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांची समजूत काढल्यानंतर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. असे सांगण्यात येत असतानाच ही नाराजी अद्यापही कमी न झाल्याची परिस्थिती समोर येत आहे. विरोधाच्या कारणामुळे थांबवलेला पक्षप्रवेश अचानक घेतला जात आहे असा आरोप होत असून या प्रवेश बाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला काहीच माहिती नाही असे वक्तव्य केल्याने गोंधळ अधिक वाढला आहे. बडगुजर यांचे दहशतवादी पार्टीतील फोटो बाहेर काढणाऱ्या मंत्री निलेश राणे यांचाही पक्षप्रवेशा संदर्भातील विरोध मावळण्याचे समोर आले आहे. एकूणच बडगुजरांच्या प्रवेशाबाबत भाजपमध्ये गोंधळात गोंधळ असल्याचे पाहायला मिळत आहे.