Auto rickshaws are not just a means of transport but an integral part of lifestyle : केवळ गरजू आणि पात्र व्यक्तींना वितरित करावे ई रिक्षा
chandrapur : ऑटो रिक्षा ही शहरी व ग्रामीण प्रवासी सेवेतील महत्वाची कडी आहे. या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ऑटो रिक्षाचालक ही केवळ एक वाहतूक सेवा नाही, तर जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक आहे. त्यांच्याही अनेक अडचणी आहेत, त्या समजून घेऊन उपाययोजना करणे ही आपली जबाबदारी आहे, असे म्हणत राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ऑटो रिक्षा चालक-मालकांच्या विविध समस्यांसंदर्भात नियोजन भवनात महत्वपूर्ण बैठक घेतली.
रिक्षा चालकांच्या अडचणी दूर करण्यासाठी बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले. हे निर्णय शहरातील वातहुकीला शिस्त लावण्यासोबतच रिक्षा चालकांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीतही बदल घडवून आणतील, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. शासन आणि रिक्षा चालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, यासाठी या निर्णयांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जावी, अशा सुचनाही आमदार मुनगंटीवार यांनी दिल्या.
Sudhir Mungantiwar : स्वातंत्र्य दिन सोहळ्यात लोकतंत्र सेनानींना सन्मानपूर्वक निमंत्रण द्यावे
बैठकीला वणीचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, डॉ. मंगेश गुलवाडे, तसेच नम्रता आचार्य ठेमसकर, अजय सरकार, बंडू गोरकार, ऑटो मालक चालक संघटनेचे अध्यक्ष मधुकर राऊत, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर तसेच ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
Sudhir Mungantiwar : लोकतंत्र सेनानींनी गाठले चंद्रपूर अन् दिले मुनगंटीवारांना आशीर्वाद !
महानगरपालिकेचे अधिकारी व ऑटो चालक-मालक संघटनेचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून व्यापारीदृष्ट्या उपयुक्त ठिकाणी ऑटो स्टॅंड विकसीत करावी. या स्टॅंडमध्ये वाहतूक सुलभता, पार्कींग व्यवस्था व इतर सुविधा विचारात घेऊन उत्तम डिझाईन तयार करावे. जिल्ह्यातील बल्लारपूर, मुल, राजुरा, गडचांदूर, भद्रावती व गोंडपिंपरी येथेदेखील संभाव्य टिकाणांची पाहणी करून ऑटो स्टॅंडसाठी नियोजन करावे, असे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी दिले. यासाठी रस्ते सुरक्षा योजना – २०१६ व डीपीडीसीअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar :सुधीर मुनगंटीवारांचा वाढदिवस जिल्हाभर ‘विकास दिन’ म्हणून साजरा
ई रिक्षा केवळ गरजू आणि पात्र लोकांनाच द्यावे. यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सुसंगत धोरण तयार करावे. ई रिक्षा केवळ विशिष्ट मार्गांवरच चालवण्याचा प्रस्ताव आहे. त्यासंबंधी लवकरच समर्पक मार्गदर्शक सुचना जारी केल्या जातील. याशिवाय सर्व वितरकांची यादी तयार करण्याचे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी दिले. ३१ रिक्षा स्टॅंडची संख्या वाढवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात दोन नवीन रिक्षा स्टॅंड विकसीत केले जाणार असल्याची माहितीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.