Breaking

Sunil Tatkare : भाजपनंतर आता राष्ट्रवादी साईचरणी !

NCP adhiveshan in Shirdi  : दोन दिवसीय ‘नवसंकल्प शिबीर’ आता शिर्डीत; छत्रपती संभाजीनगर ऐनवेळी रद्द

Mumbai : भाजपचे महाअधिवेशन शिर्डीत झाल्यानंतर आता अजित पवारांची राष्ट्रवादीही साईचरणी नतमस्तक होणार आहे. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबीर शिर्डीमध्ये होणार आहे. महायुतीमधील दोन पक्षांनी शिर्डीच का निवडले आहे, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. विशेष म्हणजे आधी हे शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे होणार होते. पण ऐनवेळी स्थळ बदलल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

दि. १८ व १९ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगर येथे होणारे नियोजित दोन दिवसीय ‘नवसंकल्प शिबीर’ आता शिर्डी येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये या शिबिराची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र या शिबिराला फ्रंटल व सेल आणि इतर पदाधिकाऱ्यांंनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचा आग्रह धरला. पदाधिकाऱ्यांची जास्त संख्या लक्षात घेता छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासाची व्यवस्था अपुरी पडत होती. त्यामुळे हे शिबीर शिर्डी येथे घेत असल्याचे सुनील तटकरे म्हणाले.

Nitin Gadkari : वीरांच्या गौरवासाठी व्यासपीठावरून खाली उतरले नितीन गडकरी !

या शिबिरात सभासद नोंदणीचा शुभारंभ होणार आहे. शहर, जिल्हा, तालुक्यांमध्ये सभासद नोंदणी योग्य पध्दतीने व्हावी, यासाठी निरीक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. जेणेकरून विहीत कालावधीत सभासद नोंदणी पूर्ण करण्याचे पक्षाचे नियोजन होऊ शकेल. या शिबिरात वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांना प्रभावी मांडणी करण्यासाठी निमंत्रित करणार आहोत. या शिबिरामध्ये पक्षाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

Beed Case वाल्मिक कराडवर अखेर मकोका; एसआयटीने घेतलं ताब्यात

नवी ऊर्जा नवी प्रेरणा
दोन दिवसीय नवसंकल्प शिबीरातून नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी फेब्रुवारीमध्ये पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम संघटनेला दिले जाणार आहेत. त्यातून पक्षाचा प्रभाव व्यापक पध्दतीने राज्यात निर्माण केला जाणार आहे, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.