Allegations of a scam of Rs 4800 crore in the ‘Ladki Bahin’ scheme : कारवाईची मागणी करत, सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले अनेक प्रश्न
Mumbai : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेवर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या योजनेत तब्बल 26 लाख 34 हजार अर्ज अपात्र ठरवण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्यानंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी या योजनेत पुरुषांनीही अर्ज केल्याच्या बाबी उघडकीस आल्या असून, हे अर्ज मंजूर कसे झाले यावरून टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या योजनेत तब्बल 4800 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पीक विमा, शिष्यवृत्ती, आयुष्मान भारत योजनेत फॉर्म रिजेक्ट होतात, मग ‘लाडकी बहीण’ योजनेत पुरुषांचे फॉर्म रिजेक्ट कसे झाले नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Pune Police : मंत्र्यांवर आक्षेप नाही, पण पुणे पोलिसांवर अब्रु नुकसानीचा दावा करणार
सुळे यांनी म्हटलं की, निवडणुकीच्या केवळ तीन महिने आधीच ही योजना जाहीर झाली आणि आता लाखो अपात्र अर्ज पुढे आले. यावरूनच या योजनेत नियोजनाचा अभाव आणि सॉफ्टवेअरमधील घोटाळा स्पष्ट होतो. ज्यांनी ही यंत्रणा तयार केली, ज्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या योजनेसाठी 4800 कोटी रुपये खर्च करण्यात आले, आणि त्याचवेळी सरकारने शिक्षण, आरोग्य आणि इतर महिला केंद्रित योजनांना निधीचा काटा लावल्याची कबुली स्वतः सरकारने दिली असल्याचंही सुळे यांनी नमूद केलं.
Protest in Malkapur : मलकापूरात ‘समतेचे निळे वादळ’ संघटनेची जोरदार निदर्शने
मंत्र्यांचेच वक्तव्य आहे की ‘लाडक्या बहिणीं’मुळे आम्ही निवडणूक जिंकलो, मग हेच पैसे इतर गरजू योजनांवर का नाही खर्च केले गेले? असा सवाल करत त्यांनी या संपूर्ण योजनेवर संशय व्यक्त केला. सुळे यांनी या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन करावं अशी मागणी केली आहे. जर सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही, तर मी हा विषय संसदेत मांडून केंद्र सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी करेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Kirit Somaiya : वर्षभरात १० लाख रोहिंग्यांना बनावट जन्म प्रमाणपत्र?
मात्र, या सर्व प्रकरणात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यावर त्यांनी थेट आरोप न करता स्पष्ट केलं की, मी अदिती तटकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करणार नाही. त्या एक महिला आणि युवा नेत्या आहेत. मला माहिती आहे की सरकार कसं चालतं. ही संपूर्ण जबाबदारी सरकार आणि कॅबिनेटमधील वरिष्ठ नेत्यांची आहे. राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून निवडणुकपूर्वी महिलांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता या योजनेतील अडचणी, अपात्र अर्ज, निधीवाटपातील अपारदर्शकता आणि सॉफ्टवेअरवरील शंका यामुळे या योजनेभोवती संशयाचं वलय निर्माण झालं आहे.