Breaking

Umara Grampanchayat : आई-बहिणीवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंड!

Rs 500 fine for profanity with the name of mother or sister : उमरा ग्रामपंचायतच्या महिला सन्मान ठरावाची राज्यभर चर्चा

Akola पूर्वीच्या काळी आई-बहिणींवरून शिवी देताना परिस्थिती, स्थळ, वेळ, काळ बघितले जायचे. आता मात्र अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सारेच बिनधास्त अशा शिव्या देतात. मात्र विदर्भातील एका ग्रामपंचायतीने आई-बहिणींवरून शिवी देताना कुणी आढळला तर त्याच्यावर दंड ठोकण्याचा ठराव केला आहे. हा महिला सन्मान ठराव सध्या चांगलाच चर्चेत आहे.

उमरा (ता.अकोट) ग्रामपंचायतीत विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली. यावेळी स्त्री सन्मानासाठी महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आला. या ठरावानुसार, गावात कुणीही आई किंवा बहिणीच्या नावावर शिवीगाळ करून अर्वाच्च भाषा वापरल्यास संबंधितावर ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. या ग्रामसभेत बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे आणि महिला सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवणे यासंदर्भातही ठराव करण्यात आले.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प

या वेळी सरपंच अर्चना लबडे अध्यक्षस्थानी होत्या. महाराष्ट्राला महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि मूलभूत हक्कांसाठी लढा देण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेत शासनाने महिलांसाठी न्याय आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासह, प्रत्येक गावात महिला व बालकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ध्येय ठेवले आहे.

या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून बालविवाह, जाचक विधवा प्रथा आणि अन्यायकारक अंधश्रद्धा यांच्या समूळ उच्चाटनासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीमार्फत या सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

Harshawardhan Sapkal : राजीनामा तर देवेंद्र फडणवीसांनीच द्यायला पाहिजे !

ज्या स्त्रीच्या उदरामध्ये आपण नऊ महिने राहून जन्म घेतो, तो किती पवित्र देह आहे. त्या पवित्र देहाचा अवमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे यापुढे गावात आई-बहिणींवरून शिवीगाळ करणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारला जाईल, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे,असे सरपंच अर्चना लबडे यांनी सांगितले.