Wife victims organization seeks demands including Mens Commission : पत्नी पीडित संघटनेचे ‘पुरुष आयोगा’सह अनेक मागण्यांसाठी साकडे
Chatrapati Sambhajinagar : पत्नी पीडित संघटनेने ‘पुरुष आयोगा’सह इतर अनेकविध मागण्यांसाठी, वटपौर्णिमेच्या दिवशी पिंपळ पोर्णिमा साजरी केली. नको असलेल्या आणि भांडकुदळ बायकोच्या नावाने पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारल्या. या घटनेने केलेला हा उपक्रम सध्या चांगलाच गाजत आहे.
सर्वत्र वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महिलावर्ग सजून धजून उपवास करून वडाची पूजा करत जन्मोजन्मी हाच पती मिळू दे! यासाठी प्रार्थना करत आहेत. दुसरीकडे पत्नीपीडित असलेले लोकही हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करताना पाहायला मिळत आहेत. पुरुषांविरोधात महिलांचे हिंसाचाराचे गुन्हे वाढत आहेत.
पत्नीकडून होत असलेल्या अत्याचारामुळे पुरुषांची मानसिकता’ खचून गेली आहे. या विरोधात कार्यरत असलेल्या पत्नीपीडित संघटनेत सुमारे 11 हजार सदस्य झाले आहेत. त्यांनी 250 वर पीडित पुरुषांना खटले लढण्यासाठी कायद्याचे ज्ञानही दिले आहे.
Maharashtra Navnirman Sena : मनसेचा ‘घंटानाद’, सिंचन विहीर योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप
भांडकुदळ बायको सात जन्मी नको म्हणून पुरुषांकडून पिंपळाला 7 उलट्या फेऱ्या मारत प्रार्थना करण्यात आली आहे. कायद्याचा दुरुपयोग करुन पतीला वेठीस धरणारी पत्नी नको अशी प्रार्थना पीडित पुरुषांकडून करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये वटसावित्री पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा साजरी करत उत्तर देण्यात आले.
Vidarbha farmers : शेतकऱ्यांचे बीज बिल माफ करा, अन्यथा तीव्र आंदोलन!
पतीला आणि पतीच्या कुटुंबाला वेठीस धरणारी, आयुष्य उध्वस्त करणारी पत्नी यापुढे कधीच नको अशी प्रार्थना करण्यात आली तसेच पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकतर्फी व्यवस्थेविरोधात साकडे घालण्यात आले. काही वर्षापासून पत्नीपीडित संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
Raghuvanshi murdar case : आदर्श राज्य कारभार करणाऱ्या ‘रघुच्या वंशा’त ही कीड कुठून आली ?
याप्रकरणी पत्नीपीडित संघटनेच्या सदस्यांचे म्हणणे आहे की, ‘वटसावित्री पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाला ७ फेरे मारून सात जन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना करतात. मात्र आतापर्यंत असे अनेक पुरुष आहेत त्यांच्या पत्नीने कायद्याचा दुरुपयोग करून त्यांचं आयुष्य उध्वस्त केलं आहे. सरकारने महिला सबलीकरणासाठी कायदे तयार केले. मात्र याच कायद्याचा काही महिला दुरुपयोग करत आहेत. खोट्या गुन्ह्यांमध्ये पती व त्याच्या कुटुंबाला अडकवलं जात आहे.’