Indecent act with minor girl, accused gets five years rigorous imprisonment : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुभारही १ वर्ष सश्रम कारावास
Wardha : एका युवकाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले. न्यायालयाने त्याला पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. हा निर्वाळा येथील जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी दिला.
रोशन (३१) असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सकाळी पीडिता तिच्या मोठ्या आईच्या अंगणात गेली होती. तेथे ती आरोपीच्या बहिणीसोबत नाली साफ करीत होती. त्यावेळी आरोपीने मागून येऊन तिचे डोळे बंद केले. ती घराकडे ओरडत गेली. आरोपीसुद्धा तिच्या मागे गेला. त्यामुळे पीडिता जोरात ओरडली असता तिची आई बाहेर आली. तिने सर्व प्रकार बघितला. आई आरोपीवर ओरडली असता तो पळून गेला.
Crime in Wardha : रशियातील विद्यापीठात प्रवेश करून देतो म्हणून उकळले पैसे!
याप्रकरणी पीडितेने आईसोबत आर्वी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली होती. पोलिस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी यांनी गुन्हा दाखल करून त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता विनय घुडे यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी प्रशांत कांबळे यांनी त्यांना सहकार्य केले. या प्रकरणात पाच साक्षीदार तपासण्यात आले.
Crime in Wardha : अट्टल घरफोडे सापडले, १५.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपी रोशन याला कलम ९ (एम) सहकलम १० बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पाच वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास तसेच कलम ११ (आय) सहकलम १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुभार १ वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास १५ दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच पीडितेला नुकसानभरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.