The PANGOLIN is being conserved in Wardha : वर्धा वनपरिक्षेत्रात १३ मांजर असल्याचा तज्ज्ञांचा दावा
Wardha जगात सर्वांत जास्त तस्करी होणारा, तसेच आंरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक मागणी असणारा सस्तन प्राणी म्हणजे खवले मांजर. खवले मांजरचा वर्धा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे दिसून येत आहे. हा अत्यंत दुर्मीळ असलेला प्राणी वर्धा वनपरिक्षेत्रातील पुलगाव व आगरगाव या परिसरात सहज नजरेस पडत आहे. वनविभागाकडूनही त्याचे संवर्धन केले जात आहे.
खवले मांजराला इंग्रजीमध्ये (PANGOLIN) असे म्हणतात. हा प्राणी निशाचर असून, बिळांमध्ये आणि पोकळ झाडांमध्ये राहतो. प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी त्याचे खाद्य आहे. जगातील सस्तन प्राण्यांमधील सर्वांत जास्त अवैधरीत्या तस्करी होणारा हा प्राणी आहे. जगातील संपूर्ण अवैध तस्करीच्या २० टक्के तस्करी ही एकट्या खवले मांजराची होते.
खवल्या मांजराची शिकार त्याच्या मांस व खवल्यांसाठी केले जाते. याच्या खवल्यांची विशेष मागणी चायना, व्हिएतनाम, थायलंड आणि अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आहे. चीनमध्ये खवल्या मांजर खाणे अत्यंत श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. तसेच त्यांचा कामोत्तेजक म्हणून औषधीसाठी वापर केला जातो. 18 फेब्रुवारी हा जागतिक खवले मांजर दिन म्हणून साजरा होतो.
वर्धा वनपरिक्षेत्रात असलेल्या पुलगाव, नाचनगाव व आगरगाव व त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रांचा समावेश होतो. गेल्या ४ वर्षांत आतापर्यंत १३ खवले मांजरांचे रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडले गेले आहे.
YDCC बँकेत काँग्रेसकडून काँग्रेस अध्यक्षांना होणाऱ्या विरोधाचा अर्थ काय ?
तस्करीत महाराष्ट्र आघाडीवर
खवले मांजराच्या शिकारीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचे आढळून आले आहे. 2018 ते 2022 या कालावधीत ओडिशा पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता. तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर वन कायदे केले आहेत. पण तस्करी थांबलेली नाही.