Breaking

Nagpur Jail : एकट्या पूर्व विभागावर 16 कारागृहांचा वर्कलोड!

Workload of 16 prisons on Eastern Division alone nagpur : विभाजन झाल्यास समस्या सुटणार

Nagpur राज्यातील सर्वाधिक कैद्यांचा समावेश असलेल्या कारागृहाच्या पूर्व विभागातून तब्बल 16 कारागृहांचे कामकाज सुरु आहे. मात्र, बुलडाणा ते गडचिरोली अशा मोठ्या क्षेत्रफळाचा कारभार सांभाळणे अडचणीचे होत आहे. पूर्व विभागाचे विभाजन झाल्यास अनेक अडचणींवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत राज्य कारागृह विभाग सकारात्मक नसल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य कारागृह विभागाचे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे चार विभाग आहेत. पूर्व विभागाचे मुख्यालय नागपुरात असून या विभागातून तब्बल 16 कारागृहांचा कारभार चालतो. त्यामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह, अकोला जिल्हा कारागृह, चंद्रपूर जिल्हा कारागृह, मोर्शी खुले कारागृह, भंडारा जिल्हा कारागृह, वर्धा जिल्हा कारागृह, यवतमाळ जिल्हा कारागृह, वाशिम जिल्हा कारागृह, बुलढाणा जिल्हा कारागृह, गडचिरोली खुले कारागृह, अकोला महिला खुले कारागृह, यवतमाळ खुले कारागृह, नागपूर खुले कारागृह, अमरावती खुले कारागृह, वर्धा खुले कारागृहांचा भार आहे. या सर्व कारागृहांमध्ये सर्वाधिक गुन्हेगारांचा समावेश आहे.

Nagpur Police : मुंबईनंतर उपराजधानीची देहव्यापारात आघाडी !

क्षेत्रफळाच्या दृष्टीने बुलढाणा ते गडचिरोलीपर्यंतचा कारभार प्रशासकीय दृष्टीने अडचणीचा आहे. प्रशासकीयदृष्ट्या आणि कर्मचाऱ्याच्या हिताच्या दृष्टिने महाराष्ट्र कारागृहाच्या पूर्व विभागाचे विभाजन होणे आवश्यक आहे. तसेच नवीन उपमुख्यालय अमरावती येथे झाल्यास कारागृहाच्या कामाकाजासंदर्भात अनेक अडचणी सुटतील. तसेच अधिकाऱ्यांवरही एवढ्या मोठ्या कामाचा ताण येणार नाही. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या दृष्टीने किंवा कैद्यांच्या स्थानांतराच्या दृष्टीने अमरावती शहरात उपमुख्यालय होणे गरजेचे आहे.

कैद्यांचे स्थानांतरण होईल सोपे..

पूर्व विभागातील 16 कारागृहामधील कैद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपमुख्यालयाच्या हालचाली होणे गरजेचे आहे. एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहात कैद्यांचे स्थानांतरण अनेकदा केले जाते. त्या कामासाठीसुद्धा उपविभाग झाल्यास सोपे जाईल. तसेच कैद्यांची संचित रजा, अभिवचन रजाबाबत असलेल्या कागदपत्रांची पूर्तताही लवकर होईल. कैद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही उपमुख्यालयाचा विचार सकारात्मकतेने होणे गरजेचे आहे.