Breaking

RTO Check Post : आंदोलनाच्या नावावर टोळक्याचा पिंपळखुटी चेक पोस्टवर उच्छाद, पोलिसही हतबल !

 

Gang attacks RTO’s Pipalkhuti check post, police also helpless : जिल्हा स्तरावरील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी करावी कारवाई

Nagpur : असामाजिक तत्वांच्या विरोधात पोलिसही जेव्हा कारवाई करण्यास धजावत नाही, तेव्हा काय होतं, याचा अनुभव सध्या आरटीओच्या पिंपळखुटी चेक पोस्टवर येत आहे. या चेकपोस्टवर गेल्या ८ – १० दिवसांपासून २० ते २५ जणांचे टोळके येते आणि दादागिरी करून येथील वजन काटे आणि लेन ताब्यात घेते. या प्रकारे सर्रास वसुली करून वाहने सोडली जात आहे. या टोळक्याचा म्होरक्या स्वप्नील नामक तरुण असल्याचे सूत्र सांगतात. या प्रकरणात पोलिसही हतबल झाल्याचे सांगण्यात येते.

नागपूर – हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर पिंपळखुटी आंतरराज्यीय चेक पोस्ट आहे. सद्भाव नामक कंपनीला येथील कंत्राट दिले आहे. परिवहन विभागातील (RTO) अधिकाऱ्यांच्या ड्युटी बदलत असतात. अशात कंपनीचे कर्मचारी येथे पूर्णवेळ असणे अपेक्षीत आहे. पण कंपनीने येथे पुरेसे मनुष्यबळ दिलेले नाही. गार्ड्सची संख्या अपुरी आहे. त्यामुळ येथे लुट सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Dawwa Gampanchayat : डव्वा ग्रामपंचायतचा डंका, पंतप्रधानांकडून गौरव!

पिंपळखुटी चेकपोस्टवर अंमली पदार्थ, जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. अधिकारी आणि कर्मचारी अशा वाहनांना थांबवून कारवाई करतात. त्यांना दंडही ठोठावला जातो. याशिवाय ओव्हरलोड वाहनांवरही कारवाई केली जाते. सद्यस्थितीत येथे परिवहन विभागाचे अधिकारी आणि सद्भाव कंपनीचे गार्ड, असे मिळून १२ जण कार्यरत असल्याची माहिती आहे. धुडगूस घालणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी त्यांचा प्रतिकार करू शकत नाही. परिणामी सर्रास लुट सुरू आहे. हे टोळके रात्री ८ ते १० या वेळात पैसे घेऊन वाहने सोडतात आणि गावात पसार होतात, असेही सांगण्यात आले आहे.

MLA Rajesh Bakane : अनधिकृत आदेश, तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी

सीसीटीव्ही कशासाठी ?
या प्रकाराविरोधात काही अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पण पोलिस आले की टोळके पसार होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच खेळ सुरू होतो. चेक पोस्टवरील सीसीटीव्हीमध्ये हा गोंधळ कैद झालेला आहे. त्या आधारावर तरी पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षीत आहे. पण सद्भाव कंपनीनेसुद्धा अधिकृतपणे तक्रार केली नसल्याने अद्याप कारवाई झाली नसल्याचे सूत्राने सांगितले.

Education in Gondia : गोंदियातील २२८ शाळांचा वीजपुरवठा खंडित

धुडगुस नव्हे आंदोलन..
चेक पोस्टवर धुडगुस घालणारे टोळके स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी करतात. कुणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही हक्कासाठी आंदोलन करतोय, असे उत्तर देतात. पण आंदोलनासाठी त्यांनी रात्री ८ ते १० हीच वेळ का निवडली, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही. आता त्यांना रोखणारे कुणी नसल्याने त्यांचा उच्छाद वाढत चालला आहे. हे सर्व जवळपासच्या गावांतीलच असल्यचे सांगण्यात येते. आता जिल्हा स्तरावरील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीच कारवाई करावी, अशी मागणी आहे.