Breaking

Prataprao Jadhav : श्रावणात गोमुख धारेखाली भाविकांना हवी अंघोळीची परवानगी

Devotees want to bath at Gomukh during Shravan : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी

Buldhana जगप्रसिद्ध लोणार Lonar सरोवर परिसरातील धारातीर्थ गोमुख धारेखाली श्रावण महिन्यात भाविकांना अंघोळ व कावडीसाठी जलस्त्रोत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.

प्रतापराव जाधव यांनी ही मागणी करताना स्पष्ट केले की, लोणार सरोवर हे धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे स्थळ असून ते बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येते. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या खाऱ्या पाण्याच्या सरोवराची ओळख जागतिक पातळीवर आहे. या परिसरातील ‘धारातीर्थ गोमुख’ हे श्रावण महिन्यात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Case of assault on a Dalit youth : जातीय अत्याचाराविरोधात मेहकरमध्ये संतापाचा उद्रेक

कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गोमुख धारेखाली अंघोळीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा धोका पूर्णतः निवळलेला असूनही प्रशासनाने गोमुख धारेखाली अंघोळीवर कायमस्वरूपी बंदी ठेवली आहे, ही बाब भाविकांच्या श्रद्धेवर आघात करणारी असल्याचे जाधव यांनी नमूद केले.

“श्रावण महिन्यात भाविकांसाठी हे तीर्थक्षेत्र खुले ठेवले गेले पाहिजे. भाविकांना गोमुखाच्या पाण्याखाली अंघोळ करण्यास आणि पवित्र जल नेण्यास परवानगी देणे, ही श्रद्धा आणि परंपरेचा सन्मान ठरेल,” असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Shivajirao Moghe : महायुती सरकार आदिवासीविरोधी, शिवाजीराव मोघे आक्रमक

या मागणीमुळे आता धार्मिक क्षेत्रात सकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, केंद्र सरकारकडून यावर लवकर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. लोणार सरोवराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही या मागणीला महत्त्व प्राप्त होत आहे.