Farmers suffer due to mud in underpass due to rain : डोणगाव परिसरात तातडीने उपाययोजनांची मागणी
Dongao : वाहनचालकांसाठी जलद गतीचा अनुभव देणारा समृद्धी महामार्ग, शेतकऱ्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. डोणगाव परिसरातील अंडरपासमध्ये पावसामुळे प्रचंड चिखल साचल्याने शेतकऱ्यांची शेतीपर्यंतची वाट त्रासदायक बनली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.
अंजनी बु. शिवारातील अंडरपासमध्ये गुडघाभर चिखल साचला असून, ट्रॅक्टर, पेरणी यंत्र किंवा फवारणी उपकरण नेणे अशक्य झाले आहे. समृद्धी महामार्गामुळे जुने पांदण रस्ते बंद झाले असून, नवीन अंडरपास शेतकऱ्यांसाठी अपुऱ्या सुविधा देत आहेत. दिवसाही अंधार पसरलेल्या बोगद्यातून वाट काढताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
Prataprao Jadhav : श्रावणात गोमुख धारेखाली भाविकांना हवी अंघोळीची परवानगी
महामार्गाच्या कामामुळे पावसाचे नैसर्गिक निचरा मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी अंडरपास व शेतांमध्ये साचत असून, शेतीची हानी होत आहे. शेतातील गाळ वाहून रस्त्यावर चिखल झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. “शासनाने अंडरपासची स्वच्छता, जलनिचरा व्यवस्था आणि दिव्यांची व्यवस्था करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटू शकतो,” असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.
Case of assault on a Dalit youth : जातीय अत्याचाराविरोधात मेहकरमध्ये संतापाचा उद्रेक
असली समृद्धी काय कामाची?
समृद्धी महामार्गामुळे नागपूरहून मुंबईला जाण्याचा वेळ कमी झाला. अध्ये-मध्ये लागणाऱ्या शहरांनाही कमी वेळेत पोहोचणे शक्य झाले. पण ज्या मार्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल, त्याचा काय उपयोग? असली समृद्धी कुठल्या कामाची?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.