Breaking

100 Days program : सीईओ पोहोचले बचतगटात!

CEO of Zilla Parishad interacted with Bachatgat : जिल्हा परिषदेतील अधिकारी झाले सक्रीय

Nagpur राज्य शासनाने विविध विभागांना १०० दिवसांतील कामांचे टार्गेट दिल्यानंतर जिल्हा परिषदेतील अधिकारीदेखील सक्रिय झाले आहे. सीईओ विनायक महामुनी यांनीच विविध ठिकाणी दौरे आणि भेटींवर भर दिला आहे. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांनादेखील जनतेत जावे लागत आहे. महामुनी यांनी बचतगटातील महिलांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच निधी वाटपाबाबतदेखील विचारणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांचे आठवड्यातून दोन दिवस नागपुरात कार्यक्रम असतात. त्यावेळी ते योजनांचा आढावा घेतात. दुसरीकडे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule नागपुरात ठाण मांडून अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसलेले असतात. त्यांनीही बैठकांचा धडाका लावला आहे. अशा परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परिणामी सीईओ स्वतः बाहेर पडल्यामुळे आता इतर अधिकारी देखील कामाला लागले आहेत.

Mahayuti Government : सुंदर बसस्थानकाला मिळेल ३ कोटीचे बक्षीस!

जिल्ह्यात बचतगटाच्या माध्यमातून महिला व्यावसायिकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. याकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीही खर्च केला जातो. मात्र याची योग्य अंमलबजावणी होत आहे का? तसेच महिलांच्या काय समस्या आहेत? याची माहिती घेण्यासाठी विनायक महामुनी कळमेश्वर तालुक्यातील दहेगावला भेट देऊन उमेद अभियानातील महिलांशी थेट संवाद साधला. जिल्हा अभियान व्यवस्थापक शेखर गजभिये उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) ग्रामीण भागातील महिला विशिष्ट उद्दिष्ट घेऊन एकत्र आल्यानंतर सरकार या अभियानातून बळ देते. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ‘उमेद’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातही समुदाय संसाधन व्यक्तींची एक भक्कम फळी गावपातळीपर्यंत उभी केली आहे.

Anandraj Ambedkar : राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री असलाच पाहिजे

विनायक महामुनी यांनी यावेळी बचत गटाचे रजिस्टर तपासले. उपस्थित महिलांशी उद्योगाबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले. सुरू असलेल्या व्यवसायाची माहिती जाणून घेतली. कळमेश्वर तालुक्यात अगरबत्ती उद्योग, गारमेंट उद्योग, दुग्ध उद्योग मोठ्या प्रमाणात करण्यासाठी लेबलिंग, पॅकिंग, मार्केटिंग बाबत मार्गदर्शन केले. यावेळी तालुका स्तरावरील पथक, ग्रामसंघ अध्यक्ष, सचिव, प्रभाग संघ पदाधिकारी उपस्थित होते.