BJP leader Sudhir Mungantiwar’s harsh attack on Minister of State Meghna Bordikar : राज्यात एजी पंप देताना विदर्भ – मराठवाड्यावर अन्याय
Mumbai : शेतकऱ्यांसाठी सरकारचे धोरण असते. पण हे धोरण शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरत असेल तर ते बदलवले पाहिजे. शेतकऱ्यांना सोलर पंप द्यायचा सरकारचा निर्णय चांगला आहे. पण जेथे सोलर पंप काम करत नाहीत, तेथे एजी पंप दिले पाहिजे, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज (३ जुलै) अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून लाऊन धरली.
सीआरआय कंपनीच्या कृषी सोलर पंपांच्या तक्रारीसंदर्भात उपस्थित तारांकित प्रश्नावर अर्धा तास चर्चेमध्ये बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांसाठी धोरण ठरवताना जिल्हानिहाय आणि भोगोलिक परिस्थिती बघून धोरण ठरायला हवं. सरकारने शेतकऱ्यांना सोलर पंप लावायला सांगितले. आमच्याकडे १९२१ लाभार्थ्यांनी सोलर पंप प्रस्तावित केले. त्यांपैकी ५०३ आजही प्रलंबित आहेत. परिसरानुसार कंपन्यांचा निर्णय करताना थर्ड क्लास कंपनी (सीआरआय) आम्हाला दिली. कदाचित तीच आमच्या नशीबात होती. पण पाचशेच्या वर तक्रारी होऊनही कंपनीवर कारवाई का करण्यात आली नाही ?
Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सुधीर मुनगंटीवार यांची कामगिरी ‘लई पॉवरफुल्ल’
सीआरआय कंपनीच्या विरोधात तक्रारी आल्या. त्यावर वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दिली आहे. याबाबत विभागाचेच पत्र आहे. पण २८ जानेवारीच्या तक्रारीची अद्यापही दखल घेतली गेली नाही. शेती हा मजबुतीचा व्यवसाय करायचा, तर मजबुरीचा कशाला करता? सोलर पंप घेण्याची सक्ती केली जाते. पण तेथे सोलर बसतो की नाही, हे बघितलं पाहिजे. विभाग म्हणतो पुरामुळे पंप नादुरुस्त झाले. दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागतो. या कालावधीत शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत,असे मुनगंटीवार म्हणाले.
अधिकाऱ्यांच्या नादी लागू नका..
मार्च २०२४ पर्यंत ४८.६९ कृषी पंपाचे विद्युतीकरण केले. एजी पंपाची भरलेली डिमांड वापस पाठवली. २०२४-२५ मध्ये नोव्हेंबर अखेर १ लाख २० हजार ८०७ पंपाचे विद्युतीकरण केले. पण विदर्भ मराठवाड्याचे नाही केले. ठेकेदारांना सांगायचे की विदर्भ मराठवाड्याचे करू नका. आता सांगता की एजी पंप देणार नाही, सोलरच घ्यावे लागतील, हे योग्य नाही. आमचा जिल्हा वीज निर्माण करतो, अन् आम्हालाच वीज पंप द्यायचे नाही, हा अन्याय नाही तर काय आहे, असा सवाल करत आमचे एजी पंप पूर्ण द्या. अधिकाऱ्यांच्या नादी लागू नका,असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.
अन्याय सहन करणार नाही..
१९५६ च्या करारानुसार २३ टक्के म्हणजे १० लाख ९३ हजार ७१३ पंप आमच्या वाट्याला यायला पाहिजे. दांडेकर, केळकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल तर हे मान्य करावं लागेल. मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण अन्याय सहन करायचा नाही. विदर्भातील नागपूर विभागात १७ हजार ३६१ कनेक्शन आहे. अमरावती विभागात एकूण २६ हजार ६०० एजी कनेक्शन द्यायचे आहेत. अनुशेष १ लाख २४ हजार २१ आहे. कमित कमी नवीन निमंत्रण देऊ नका पण ज्यांना निमंत्रण दिलं त्यांना तरी पुरवठा करा, अशी मागणीही आमदार मुनगंटीवार यांनी केली.
Sudhir Mungantiwar : विकासाची स्पीड अन् प्रशासनावर कमांड ; मुनगंटीवार म्हणजे प्रगतीचा ब्रँड!
मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक घेणार..
२०२० मध्ये ३०७ सौर पंप सीआरआय कंपनीच्या माध्यमातून लावले होते. पाच वर्षापर्यंत त्या कंपनीची मेंटनन्सची जबाबदारी असते. १८३ ग्राहकांच्या ५४४ तक्रारी आल्या आहेत. त्यांपैकी ५४२ तक्रारींचे निवारण झाले आहे. दोन तक्रारी पाण्याचा संदर्भातील आहेत. त्यावर उपाय काढणे सुरू आहे. सीआरआय कंपनीवर १३ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतरत्र किती एजी कनेक्शन्स दिले, त्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन आमदार मुनगंटीवार यांच्या प्रश्नावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. ९० टक्के सबसीडी सोलर पंपासाठी दिली जाते. पण ज्या शेतकऱ्यांना एजी पंपाशिवाय पर्याच नाही, त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक लवकरच बैठक घेऊ, असेही बोर्डीकर यांनी सांगितले.