The appearance of a business meeting, but suspicions of secret politics ; व्यवसायिक मिलनाचा देखावा, पण गुपित राजकारणाची संशय
Mumbai : राजकारणात ‘ नाही म्हणणं म्हणजे हो’ असं म्हटलं जातं. आणि असंच काहीसं घडतंय, कारण शिवसेनेतील वादळ थांबतंय असं वाटत असतानाच, एका भेटी’ने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे आहे.
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे राजकारणा पासून दूर असलेले सख्खे भाऊ सदानंद कदम यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची भेट घेतली. ही भेट जरी त्यांनी ‘ व्यावसायिक कारणांसाठी’ घेतली असल्याचं सांगितलं असलं, तरीही राजकीय वेगळ्या चर्चेला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी अनिल परब यांनी थेट रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर डान्सबार प्रकरण आणि वाळू घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. सावली बारवर पोलिसांचा छापा, ताब्यात घेतलेल्या मुली आणि डान्सबारचं राजकारण. हे सगळं अजूनही ताजंच असताना सदानंद कदम यांनी परब यांची शांतपणे भेट घ्यावी, हे कुणाच्याच पचनी पडलेले नाही! राजकारणात योगायोग फारसा होत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे ही भेट ‘गणपती भेट’ म्हणून साजरी करायची, की यामागे काही गुपित राजकीय गणितं आहेत, यावर चर्चा रंगत आहे.
Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात राजकीय षडयंत्राचा वास !
सदानंद कदम यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं, आम्ही दर महिन्याला एकदा व्यवसायिक कारणांसाठी भेटतो. या वेळेस गणपतीनिमित्तही भेट झाली. पण ही ‘ दर महिन्याची भेट’ नेमकी नेहमीच अशी चर्चेची का होते, हा प्रश्न काही राजकीय मंडळी विसरलेले नाहीत. रामदास आणि सदानंद कदम हे जरी भाऊ असले तरी त्यांचं नातं ‘ विळ्या-भोपळ्याचं’ असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. आणि म्हणूनच सदानंद कदम यांच्या परब भेटीला वेगळं महत्त्व दिलं जात आहे. विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असतानाच ही ‘भेट’ अनेक शक्यता तयार करत आहे.