Fadnavis’ strong statement in Goa : गोव्यात फडणवीस यांचं ठाम वक्तव्य
Goa : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोव्यात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनासाठी पोहोचले. यावेळी बोलताना त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत, ओबीसी समाजासाठी घेतलेल्या भूमिका आणि निर्णयांची सविस्तर माहिती दिली. फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी आज मुख्यमंत्री आहे, कारण मला ओबीसी समाजासह सर्व समाजाचा आशीर्वाद मिळालाय.”
फडणवीस म्हणाले , ओबीसी समाजासाठी लढण्याचा अर्थ इतर समाजाच्या विरोधात लढतोय, असे चित्र रंगवले जात आहे, जे अत्यंत चुकीचे आहे. समाजासाठी काम करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे, आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा, यासाठी माझा लढा सुरूच राहणार आहे. मला याबाबत टीकेचा सामना करावा लागला, पण तरीही मी मागे हटलो नाही.
Ladki bahan Yojana : घरोघरी पडताळणी, अपात्र लाडक्या बहिणींना दणका !
ओबीसी महासंघाच्या स्थापनेपासूनच्या आठवणी जागवत त्यांनी 2005 मध्ये सुरू झालेल्या या संघटनेच्या वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले. “एक छोट्या खोलीत सुरू झालेली ही चळवळ आज एवढ्या मोठ्या अधिवेशनापर्यंत पोहोचली आहे, हे प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले.
फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे निर्णय नमूद करताना सांगितले की, आपण ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची संधी सुरू केली. त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असून अनेक विद्यार्थी आता विदेशात शिक्षण घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देत फडणवीस म्हणाले की, देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान ओबीसी समाजातून आले. मोदींनी सर्वाधिक ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरही ओबीसी समाजाचा आवाज अधिक बुलंद झाला आहे.
आरक्षणासंदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही ओबीसी समाजासाठी 50 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात 27 टक्के आरक्षण परत मिळवून देणे हे सर्वात मोठे यश आहे. कोर्टात या आरक्षणाविरोधात काही लोक गेले, पण शेवटी न्यायालयानेही आमचा निर्णय योग्य ठरवला.
Shindes Delhi visit : अमित शाहांसमोर महायुतीतील विसंवादाची चर्चा !
शेवटी, समाजकल्याणासाठी निधीच्या अभावाचा मुद्दा फेटाळून लावत फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुरवणी मागण्यांद्वारे गरजांनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोव्यासारख्या राज्यातही ओबीसी समाजासाठी ठोस निर्णय घेणार आहोत.