Shashikant Shinde : सत्ताधाऱ्यांच्या अवास्तव खर्चामुळे राज्य कर्जबाजारी

The state is in debt due to the ruling party’s excessive spending : शरद पवार गटाच्या नेत्याची महायुतीवर टीका

Buldhana “मागील काही वर्षांत सत्ताधाऱ्यांनी अवास्तव कामे हाती घेतली, बजेटच्या बाहेर खर्च केला आणि निधीचा अपव्यय केला. त्यामुळे शासनाकडे लोकहिताच्या योजनांसाठी पैसेच उरलेले नाहीत,” अशी तीव्र टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषदेत केली.

शिंदे म्हणाले की, राज्यावर सध्या दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ठेकेदारांची बिले भागवण्यासाठीसुद्धा सरकारकडे पैसे नाहीत. यामुळे अनेक ठेकेदार आत्महत्येस प्रवृत्त झाले असून, सांगली व नागपूरसह राज्यभरात कोट्यवधी रुपयांची बिले थकली आहेत.

नगरविकास व नगररचना विभागांतर्गत नव्या कंपन्या स्थापन करून त्यांच्यामार्फत बँकांकडून कर्ज उचलले जात आहे. या कंपन्यांचे कर्ज, व्याज व हमी सरकार देत असल्याचा आरोप त्यांनी महायुती सरकारवर केला. “अवास्तव खर्चावर नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे,” असे शिंदे म्हणाले.

Vidarbha Farmers : पीक विमा कंपनीने दिली १९ रुपयांची भरपाई!

महायुती सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचा आरोप करताना शिंदे म्हणाले, “प्रत्येकाला वाटते की मीच मुख्यमंत्री आहे, त्या पद्धतीने वागणूक दिली जाते. सरकारमध्ये नियंत्रण नसल्यानेच अजित पवार व आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत.”
“जेव्हा लोकांवर अवास्तव निर्णय लादले जातात, तेव्हा तरुणांसह समाजात असंतोष निर्माण होतो. धर्माच्या नावाखाली होणारे विभाजन लोकांना कळले की, शंभर टक्के क्रांती होईल आणि ती लोकशाहीची क्रांती असेल,” असे शिंदे म्हणाले.

My Kumku My Country : माझं कुंकू – माझा देश’ आंदोलनाची घोषणा !

तरुणांची वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आणि भांडवलशाहीला पूरक असलेले निर्णय यामुळे जनतेत असंतोष वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. “काही दिवसांनी भारतातही लोकशाहीच्या माध्यमातून हुकूमशाहीची बीजे रोवली जातील, अशी भावना समाजात तयार होत आहे,” असा इशारा शिंदे यांनी दिला.