Breaking

MSRTC : एक समुपदेशक अख्ख्या जिल्ह्यात फिरतो!

Driver’s Mental Health Dependent on single Counsellor : चालकांचे मानसिक आरोग्य एका समुपदेशकाच्या भरवशावर

Wardha विभागातील एसटी चालक व वाहक यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक स्वतंत्र समुपदेशक नियुक्त करण्यात आला आहे. हा समुपदेशक वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी व तळेगाव या पाच आगारांत जाऊन चालक व वाहकांचे समुपदेशन करतो. दैनंदिन 212 बसेसद्वारे प्रवाशांची वाहतूक करणारे हे चालक व वाहक तणावमुक्त राहणे आवश्यक आहे, यासाठी त्यांचे नियमित समुपदेशन होणे गरजेचे आहे. पण अख्ख्या जिल्ह्यात केवळ एकच समुपदेशक असल्यामुळे त्याच्या कामाला मर्यादा आल्या आहेत.

वर्धा विभागात एकूण 412 चालक, 415 वाहक व अन्य कर्मचारी सेवा बजावत आहेत. या कर्मचार्यांच्या आरोग्य तपासणी आगारात केली जाते व फिट असलेल्या चालकांना कर्तव्यावर पाठवले जाते. परिवहनमंत्र्यानी दहा वर्षांपूर्वीच एसटीच्या चालकांचे समुपदेशन करण्यासाठी विभागात समुपदेशकाची निवड करण्याची सूचना केली होती, मात्र वर्धा विभागात केवळ एकच समुपदेशक नियुक्त आहे.

Anil Deshmukh : वाल्मिक कराडवर मकोका का लावत नाही ?

चालक बस चालविताना मानसिक तणावाखाली असल्यास अपघाताची घटना घडू शकते. मद्यप्राशन करून प्रवासी वाहतूक करणे धोकादायक आहे व बस चालविताना दडपण असता कामा नये. अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी ताणतणाव विरहित बस वाहतूक करणे गरजेचे आहे. यासाठी चालकांचे समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे.

एसटी चालविताना बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चालकाकडे असते. प्रवास सुरक्षित होण्यासाठी चालक तणावमुक्त असणे गरजेचे आहे. बसमधील प्रवाशांचा जीव हा चालकांच्या हाती होतो, त्यामुळे त्यांचे आरोग्य सुरळीत असावे, या अनुषंगाने त्यांची आगारात आरोग्य तपासणी करण्यात येते.

Workers get diarrhea due to contaminated water : दूषित पाण्यामुळे शंभर कामगारांना अतिसाराची लागण

सरकार कधी जागे होणार?
राज्यात एसटी अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. याची कारणं वेगवेगळी असली तरीही चालकांच्या मानसिकतेचा मोठा भाग यामध्ये आहे. चालकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. एका चालकावर किमान पन्नास ते साठ प्रवाशांची जबाबदारी असते. अशात एका समुपदेशकाच्या भरवशावर एवढा मोठा कारभार किती दिवस चालणार, असा सवाल उपस्थित होत आहे.