Scam in fair price shop : खामगावमध्ये मोठा घोटाळा! १९१ क्विंटल रेशनचे धान्य केले फस्त!

191 quintals of ration grain not distributed, case filed against three : स्वस्त धान्य दुकानदारासह तिघांवर गुन्हा, धान्य वितरीतच केले नाही

Khamgao सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी असलेले शिधा धान्यच चक्क बाजारात फस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कासारखेड येथील प्रभारी स्वस्त धान्य दुकानदार सुरेश खोटरे याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने तब्बल १९१.३५ क्विंटल गहू व तांदुळ अपहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

या घोटाळ्यामुळे शिधापत्रिकाधारकांना हक्काचे धान्य न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अखेर तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी दुकानदारासह तिघांविरोधात जिवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Prakash Ambedkar : ओल्या दुष्काळासाठी ‘वंचित’ही मैदानात!

खामगाव येथील माजी दुकानदार अजित मजूर यांनी राजीनामा दिल्यानंतर वीर लहुजी चौक येथील रेशन दुकानाचा तात्पुरता प्रभार सुरेश खोटरे याला देण्यात आला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांनी तीन महिन्यांच्या धान्यापैकी फक्त एका महिन्याचेच वाटप झाले, उर्वरित धान्य वितरितच केले नाही अशी तक्रार तहसील कार्यालयाकडे दाखल केली होती.

तहसीलदारांच्या आदेशावरून झालेल्या चौकशीत १२५ शिधापत्रिकांचे जबाब नोंदविण्यात आले आणि आरोप खरे ठरले. चौकशीत ७२.५६ क्विंटल गहू (किंमत ₹१,८४,३०२) आणि ११८.७८ क्विंटल तांदूळ (किंमत ₹४,४०,७१०) मिळून एकूण ₹६.२५ लाखांचे धान्य अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.

Zilla Parishad Election : नव्या पद्धतीमुळे दिग्गजांना बसणार फटका, डिसेंबरमध्ये निवडणुका?

या प्रकारात प्रभारी दुकानदार सुरेश खोटरे (रा. कासारखेड), बिलाल खान पठाण (रा. भालेगाव बाजार) आणि शब्बीर खान पठाण (रा. पिंपळगाव राजा) या तिघांवर प्रभारी निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून २८ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणामुळे गरीब व गरजूंसाठी असलेल्या रेशन योजनांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.