Breaking

ACB arrest : जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली एक हजार रुपयांची लाच !

Clerk arrested for taking bribe of one thousand rupees : लिपिकाला अटक; एसीबीची जिल्हाधिकारी कार्यालयात कारवाई

Washim प्लॉटचा एन. ए. आदेश व नकाशासाठी १ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या कनिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १३ जानेवारीला ही कारवाई केली. या कारवाईमुळे इतरांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गैरव्यवहार होत असल्याची ओरड बरेचदा केली जाते. या कारवाईमुळे आता ते सिद्ध झाले आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी सन २०२४ मध्ये तहसील कार्यालयामार्फत झालेल्या लिलावात प्लॉट विकत घेतला होता. सदर प्लॉटचा एन. ए. आदेश व नकाशाची आवश्यकता होती. याकरिता फिर्यादी १३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे अभिलेखागार कार्यालयात गेले. यावेळी अभिलेखागार कक्षातील कनिष्ठ लिपीक रवींद्र शिवचरण वाडेकर याने एन ए आदेश व नकाशासाठी एक हजाराची मागणी केली. या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून फिर्याद दाखल केली.

Nagpur Police : फायनान्सवर वस्तू घेतली, २२ लाखांनी लुटले !

यानंतर एसीबी पथकाने पडताळणी करून सापळा रचला. तक्रारदाराने कनिष्ठ लिपीक रविंद्र वाडेकर यास १ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस अधिक्षक मारोती जगताप, अपर पोलिस अधिक्षक सचिन्द्र शिंदे, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक बालाजी टिपलवाड व अलका गायकवाड यांच्यासह पोहवा नितीन टवलारकर, विनोद मार्कंडे, राहुल व्यवहारे, विनोद अवगळे, योगेश खोटे, रवी घरत, आसिफ शेख, उज्वल देशमुख व चालक मिलिंद चन्नकेशला यांनी केली.

आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन वाशीम शहर येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होती. कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केली, तर तक्रारीची सोय आहे. पोलीस उप अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग वाशिम येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Vanchit Bahujan Aghadi : पाणीपट्टीचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात !

लाचखाेरीच्या घटना वाढल्या
शासकीय अधिकाऱ्यांना लाखाे रुपयांचे वेतन असूनही त्यांचा माेह सुटत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वर्षभरात अनेकांवर एसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. एसीबीच्या कारवायांनंतरही लाचखाेर सुधारत नसल्याचे चित्र आहे.