Farmers’ ‘Prahar’ movement : हायवे जाम, नागरिकांचे हाल अन् आता घेतली सरकारने आंदोलनाची दखल !

Ministers of State Pankaj Bhoyar and Ashish Jaiswal will reach the protest site of Bachchu Kadu at 4 pm : राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल दुपारी चारला पोहोचणार बच्चू कडुंच्या आंदोलनस्थळी

Nagpur : कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, तसेच अपंग, मच्छीमार, शेतमजूर आणि मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी ‘महाएल्गार आंदोलन’ पुकारले आहे. कालपासून (२८ ऑक्टोबर) नागपुरात समृद्धी महामार्ग, हैद्राबाद हायवे रोखून धरण्यात आला आहे. परिणामी कालपासून नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यानंतर आज राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली.

राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे सरकारतर्फे बच्चू कडू यांच्याशी आज चर्चा करायला जाणार आहेत. दुपारी चारला मंत्रीद्वय बच्चू कडुंच्या आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत. त्यामुळे चर्चेचा आणि तोडग्याचा मार्ग खुला होण्याची थोडीबहुत शक्यता निर्माण झाली आहे. बच्चू कडुंची प्रहार संघटना आणि इतर काही राजकीय पक्ष आणि संघटना शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. शेतकऱ्यांना हमी भाव, पीक विमा, कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारकडून ठोस निर्णय व्हावा, यासाठी हे आंदोलन तीव्र करण्यात आले आहे.

Moradabad case : मुरादाबाद प्रकरणानंतर महाराष्ट्रात चौकशी समिती कार्यरत !

नागपुरात सुरू असलेले हे आंदोलन उग्र रूप धारण करत असताना प्रशासन आणि सरकार दोहोवरचा तणाव वाढत चालला आहे. या पार्श्र्वभूमीवर सरकारने अखेर दोन राज्यमंत्र्यांना चर्चेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी, सहकार आणि ऊर्जा क्षेत्राशी निगडीत विषय लक्षात घेता दोन्ही मंत्र्यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. आंदोलनस्थळी आज दुपारी चार वाजता मंत्री भोयर आणि जयस्वाल हे बच्चू कडुंसोबत प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार आहेत.

सरकारच्या या हालचालीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष आहे. कारण काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तिखट आरोप केले होते आणि आता राज्य सरकारचे मंत्री स्वतः त्यांची भेट घेणार असल्याने संघर्षाचा सूर मवाळ होणार की आणखी तीव्र होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ‘सरकारकडून ठोस लिखीत आश्र्वासन मिळ्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही’, असे प्रहार संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजची भेट ही निर्णायक ठरू शकते.

Cyclone Montha: मोंथा चक्रीवादळाचा तडाखा; ताशी 100 किमी वेगाने सुटली हवा,

सरकारकडून मंत्र्यांना चर्चेसाठी पाठवणं, ही तणाव कमी करण्याची राजकीय चाल आहे. बच्चू कडू हे राज्यात जनआंदोलनाचा मोठा चेहरा बनू नये, म्हणून सरकार लवकरात लवकर तडजोडीच्या दिशेने पावलं टाकत असल्याचं राजकीय जाणकारांचे मत आहे. नागपूरच्या आणि एकंदरीतच राजकीय वातावरणात आज (२९ ऑक्टोबर) चार वाजताची ही भेट मोठ्या घडामोडींचं केंद्र ठरणार, हे निश्र्चित. बच्चू कडुंचं आंदोलन आज थांबणार की सरकारसमोर आणखी नवी अट मांडली जाणार, हे लवकरच कळेल.