Mahayuti Government : लाडक्या बहिणींमुळे लालपरी मालामाल!

 

Income of MSRTC increased due to Ladaki Bahin : २३ कोटी ९३ लाख ८० हजार रुपये कमावले

Wardha विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढली. पण अशा परिस्थितीतही गेल्या वर्षभरात एसटीने प्रवास करणारे दुपटीने वाढले आहेत. त्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींचा वाटा मोठा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी लालपरीला मालामाल केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या लाडक्या बहिणींना तिकीट दरामध्ये ५० टक्के इतकी सवलत दिलेली आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच एसटीच्या उत्पन्नातही वाढ झालेली आहे. वर्धा एसटी विभागात पाच आगारांचा समावेश आहे. २०२४ या वर्षात ९१ लाख ५७ हजार ५७५ महिलांनी एसटीने प्रवास केला होता. यातून २३ कोटी ३४ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाले होते.

Mahayuti Government : ओबीसी विद्यार्थी भोजन भत्त्यापासून वंचित !

२०२३ या वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ८२ लाख ९३ हजार ८९५ महिलांनी एसटीतून प्रवास केला. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिलांचा प्रतिसाद लाभला. त्यामुळे लाडक्या बहिणींना एसटीमुळे आणि एसटीला लाडक्या बहिणींमुळे ‘अच्छे दिन’ आले असल्याचे दिसून येत आहे. यंदा हिंगणघाट आगाराची कामगिरी दमदार राहिली असून, त्यानंतरचा क्रम आर्वी आगाराचा राहिला आहे. राज्य परिवहन विभागाच्या वतीने समाजातील विविध घटकांतील प्रवाशांना ३१ प्रकारच्या तिकीट सवलतीच्या सुविधा दिल्या जात आहेत.

Minister Makrand Patil : बुलढाणा जिल्हा परिवर्तनाच्या दिशेने

 

जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एसटी विभागातील पाच आगारांतून ९१ लाख ५७ हजार ५७५ महिलांनी प्रवास केला. वर्धा एसटी विभागास २३ करोड ३४ हजार ८० हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. दर्जेदार सेवा व अर्धे तिकीट यामुळे महिलांना प्रवास सुरू आहे.

सन २०२४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आगारात वाढ झाली आहे. या आगाराने ३२ करोड १४ लाख ५५ हजार रुपयाचे उत्पन्न मिळविले आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत सुरू झाल्यापासून महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा फायदा महामंडळाला होत आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढलेले दिसत असले तरी एसटीवर होणारा खर्च मात्र, कमी झालेला नाही. त्यामुळे खर्च करताना आजही कसरत करावी लागत आहे.

Minister Dr. Panaj Bhoyar : कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवा !

 

मार्च २०२३ मध्ये महिलांना एसटीचा प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर झाली होती. जानेवारी ते डिसेंबर २०२३ यादरम्यान वर्धा विभागातून ८२ लाख ९३ हजार ९५ महिलांनी प्रवास केला होता. त्यातून वर्धा विभागाला २० करोड ९३ लाख ३८ हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. सन २०२३ मध्ये जिल्ह्यातील पाच ही आगारात ८२ लाख ९३ हजार ९५ महिलांनी प्रवास केला होता. सन २०२४ मध्ये यांची संख्या वाढून ९१ लाख ५७ हजार ५७५ पर्यंत गेली. त्यामुळे सन २०२४ मध्ये २३ करोड ३४ लाख ८० हजार रूपयाचे उत्पन्न मिळाले आहे.