Prime Minister Modis announcement to the nation : राष्ट्राला उद्देशून पंतप्रधान मोदींची घोषणा
New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून संबोधन करत उद्या सोमवारपासून देशभरात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या या संदेशात पंतप्रधानांनी देशवासीयांना नवरात्रिच्या शुभेच्छाही दिल्या.
नवरात्रिच्या पहिल्या दिवसापासून जीएसटी दरांमध्ये कपात लागू होणार असून यामुळे अनेक उत्पादनांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जीएसटी सुधारणा भारताच्या ग्रोथ स्टोरीला गती देतील. ‘एक राष्ट्र, एक कर’ हा स्वप्नवत निर्णय आज साकारला आहे. आता काळ बदलतोय, गरजा बदलत आहेत, त्यामुळे पुढील पिढीसाठीचे हे जीएसटी सुधारणा अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत.”
ते पुढे म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाने ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी कराव्यात. “आपल्या तरुणांच्या मेहनतीने बनवलेले स्वदेशी सामान वापरल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही. प्रत्येक घर स्वदेशीचे प्रतीक व्हावे. दुकानदारांनीही अभिमानाने सांगावं की आम्ही स्वदेशी विकतो. तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनेल,” असे आवाहन त्यांनी केले.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार मुबलक युरीया, मुनगंटीवारांनी दिले निर्देश !
मोदींनी यापूर्वी नोटबंदीपासून ते कोविड लॉकडाऊनपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संबोधनातूनच जाहीर केले होते. यावेळीही नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर देशवासीयांना मोठी आर्थिक दिलासादायक घोषणा मिळाली आहे.
_____