Patients thanked Gadkari for helping in heart surgery : हार्ट पेशंट्सने मानले आभार, जनसंपर्क कार्यक्रमाला गर्दी
Nagpur कुणाचे डोळे पाणावले होते, कुणी भावूक होऊन आभार मानत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मदत केली म्हणून निःशुल्क Heart Operations होऊ शकले, या शब्दांत रुग्णांनी कृतज्ञता व्यक्त केली. यातील काहींवर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे अतिशय कठीण परिस्थितीत गडकरींनी मदतीचा हात दिल्याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेचे भाव होते.
नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे विविध कामे झाल्याबद्दलही नागरिकांनी त्यांचे आभार मानले. रविवार, दि. ९ मार्चला गडकरींचा जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. व्यक्तिगत तसेच संस्थांच्या पातळीवरील मागण्यांची निवेदने गडकरींना सोपविण्यात आली. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबंधित विषयावर कार्यवाही करण्याच्याही सूचना दिल्या.
विशेष म्हणजे गडकरी यांच्या सहकार्याने हृदयशस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनीही भेट घेतली. त्यांनी गडकरींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये काहींवर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. तर काहींच्या अँजिओप्लास्टी Angioplasty झाल्या आहेत. यापैकी अनेकांवर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे आभार मानताना रुग्णांचे डोळे पाणावले होते. काही दिव्यांगांनी देखील गडकरींची भेट घेऊन आभार मानले.
नागपुरातील एका आयआयटीच्या विद्यार्थ्याने गडकरींकडे आपली व्यथा मांडली. शारीरिक व्यंगामुळे नोकरी मिळण्यास अडचण येत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्या तरुणाची शिफारस योग्य ठिकाणी करण्याच्या सूचना गडकरींनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
काही दिव्यांगांनी नोकरीसाठी तर काहींनी कृत्रिम हात व पायांच्या मागणीसाठी निवेदन दिले. नवीन रस्त्यांसाठी, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांसाठी, आरोग्य क्षेत्रातील मागण्यांसाठी नागरिकांनी निवेदने दिली. यावेळी गडकरींनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यक्तिगत पातळीवरील प्रश्नांसह संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी गडकरींसोबत चर्चा केली.