Claims were made in outrageous terms about Chhatrapati Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अर्वाच्च्य शब्दांत केले होते दावे
Kolhapur : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना दिलेली धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अपमानजनक भाषा वापरल्याप्रकरणी नागपूर येथील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर हा सध्या कोल्हापूर पोलिसांच्या अटकेत आहे. त्याने जामिनासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. त्याच्या अर्जावर आज (७ एप्रिल) दुपारी सुनावणी होणार आहे.
शुक्रवारी (४ एप्रिल) रोजी तगड्या पोलिस बंदोबस्तात त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. याच दिवशी त्याच्या वकीलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. यापूर्वी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आज दुपारनंतर होणाऱ्या सुनावणीमध्ये न्यायालय काय निकाल देणार, याकडे लक्ष लागले आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करुन कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी कोरटकरने दिली होती.
कोरटकरने इंद्रजित सावंत यांना फोन करून शिविगाळ केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अर्वाच्च्य शब्दांत दावे केले होते. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही वापर त्याने केला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी त्याच्या घराला सुरक्षाही देण्यात आली होती.
Prashant Koratkar Vs. Indrajeet Sawant : प्रशांत कोरटकरविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!
या घटनेत विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या कोरटकरला सरकारमधीलच काही लोक सुरक्षा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर त्याला तेलंगणातून कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. आज पोलिस त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. दुपारनंतर त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणे, अपेक्षीत आहे.