Breaking

Leopard Rescue Operation : बिबट्याच्या डरकाळ्यांनी उडाली भंबेरी!

 

Leopard safely rescued from well’s protective net : विहिरीच्या संरक्षक जाळ्यातून सुखरूप काढले बाहेर

Buldhana चिखली तालुक्यातील अमडापूर शिवारात एका विहीरीभोवती लावलेल्या संरक्षक जाळ्यात बिबट्या अडकला. वन विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू होते. पण या साऱ्या प्रयत्नांमध्ये बिबट्या अस्वस्थ झाला होता. जीवाच्या भीतीने त्याने डरकाळ्या फोडायला सुरुवात केली. एका क्षणाला त्याच्या डरकाळ्यांनी साऱ्यांचीच भंबेरी उडाली होती.

वनविभागाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला सुरक्षितपणे वाचवले. शेतकरी कुंडलिक सवडतकर यांची विहीर गट क्रमांक १२१, भाग १, जांभूळखरा शिवारात खोल दरीत आहे. या विहिरीचे बांधकाम अपूर्ण आहे. मनुष्य किंवा प्राणी विहिरीत पडू नये म्हणून शेतकऱ्याने विहिरीभोवती संरक्षक जाळी लावली होती. पाण्याच्या शोधात विहिरीपर्यंत आलेला बिबट्या या जाळ्यात अडकला. सुदैवाने विहिरीत न पडता तो जाळ्यातच अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

Buldhana Police : बुलडाण्यात आता On the spot FIR

सकाळच्या सुमारास शेतकरी बाळू जाधव, राजू भगवान जाधव, सतीश गायकवाड यांना ही घटना दिसून आली. त्यांनी तत्काळ परिसरातील इतर शेतकरी व प्रशासनाला याची माहिती दिली. शेतकरी गजानन इंगळे, रमेश राऊत, मुन्ना राऊत, विनायक सरनाईक यांनी वनविभाग व पोलिसांना माहिती दिली.

वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकरे, नेवरे, व्ही.व्ही. आवटे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर पाटील (अमरावती), आय.बी. गवारगुर, संदीप मडावी, तसेच रेस्क्यू टीमचे पवन वाघ, अमोल चव्हाण, राम लोडे यांनी अमडापूर पोलिस व स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले.

Buldhana : आझाद हिंदच्या आंदोलनाची पोलीस महासंचालकांकडून दखल !

बिबट्याला गुंगीचे औषध देत सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. या वेळी बिबट्याच्या डरकाळ्यांनी उपस्थितांची भंबेरी उडाली होती. ही घटना समजताच परिसरातील हराळखेड, पिंपरखेड, अमडापूर, मोहदरी आणि इतर गावांतील शेतकरी घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले होते.