Chandrashekhar Bawankule said Vijay Vadettiwar is trying to compete with Nana Patole : त्यांनी अहवाल तपासून पाहिला पाहिजे
Nagpur : ‘मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी आहे’, असे वक्तव्य काल (१० एप्रिल) काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनी ‘वडेट्टीवार हे इंटरनॅशनल लीडर आहेत’, असे प्रत्युत्तर दिले होते. आजही वडेट्टीवार आपल्या मतावर ठाम आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यावर आज पुन्हा महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपुरात आज (११ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, विजय वडेट्टीवार नवीन नवीन पक्षनेते झाले आहेत. त्यांना काम दाखवायचे आहे. त्यामुळे ते नाना पटोले यांच्यासोबत स्पर्धा करू पाहात आहेत. काँग्रेसच्या काळातील माहिती काढली तर राजकारण वाढेल. मंगेशकर रुग्णालय प्रकरणी शासनाने गंभीर कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. काही चुका झाल्या असतील तर त्यासुद्धा दुरुस्त करण्याकरीता यांनी पुढाकार घेतला पाहिजे. ते प्रमुख नेते आहे, त्यांनी अहवाल तपासून घेतला पाहिजे.
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्री बावनकुळे म्हणाले “हॅलो कलेक्टर”
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाबद्दल विचारले असता, काल अमरावतीमध्ये आणि आज नागपुरात अवकाळी पावसाने उद्भवलेल्या परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतो आहे. आज जवळपास 13 बैठकांमध्ये तेरा तालुक्यांचा आढावा घेणार आहे.
14 एप्रिलला दीक्षाभूमी येथे मोठ्या प्रमाणात अनुयायी येणार आहेत. त्याशिवाय संविधान चौक आणि ड्रॅगन पॅलेस सर्व भागांत ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होणार आहे, त्या त्या ठिकाणी पोलीस व्यवस्था चोख असावी. अनुयायांना कुठलाही त्रास होऊ नये, याची काळजी आम्ही घेतो आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. सिंचन विभागाचीही बैठक घेऊन सविस्तर आढावा घेणार असल्याचेही ते म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : विमानसेवा ठरणार विकासासाठी बुस्टर डोज!
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावून तातडीने सर्वेक्षण करावे आणि अहवाल सरकारकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आल्याचेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.