Breaking

Department of Co-Operation & Marketing : मुंबई-पुणे नव्हे, हिंगणघाटची बाजार समिती एक नंबर!

Hinganghat APMC got first rank in state : राज्याची क्रमवारी जाहीर; दहापैकी सहा बाजार समित्या विदर्भातील

AKola राज्यातील बाजार समित्यांच्या कामगिरीवर आधारित सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची वार्षिक क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत ही क्रमवारी तयार करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन टॉपच्या शहरांचा पहिल्या दहामध्ये देखील नंबर नाही. त्याउलट वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या बाजार समितीने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

राज्याच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये सहा बाजार समित्या विदर्भातील आहेत, हे विशेष. राज्याच्या रँकिंगमध्ये हिंगणघाट- (वर्धा) 178, कारंजा लाड 171.5, बारामती 165, लासलगाव (नाशिक) 157.5, पंढरपूर (सोलापूर) 155.5, चांदूर बाजार (अमरावती) 155.5, अकोला (अकोला) 154.5, उमरेड (नागपूर) 152.5, अकलूज (सोलापूर) 149, मंगरुळपीर (वाशिम) 149, लातूर (लातूर) 148.5, संगमनेर (अहिल्यानगर) 148 या बाजार समित्यांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे.

Harshawardhan Sapkal : सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या!

राज्यातील ३०५ बाजार समित्या व ६८ खाजगी बाजारांचा समावेश करण्यात आला आहे. ही क्रमवारी पणन संचालनालयाने प्रसिध्द केली आहे. या क्रमवारीनुसार, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीने १७८ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड बाजार समितीने १७१.५ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. पुणे विभागातील बारामती बाजार समितीने १६५ गुणांसह तिसरा क्रमांक, तर पंढरपूरने १५५.५ गुणांसह पाचवा क्रमांक, आणि अकलूज बाजार समितीने १४९ गुणांसह आठवा क्रमांक मिळवला आहे.

या क्रमवारीसाठी जागतिक बँकेच्या मार्गदर्शनानुसार ३५ निकष ठरवण्यात आले होते. त्यात बाजार समितीत उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, राबविण्यात आलेल्या योजना, शेतकरी हिताच्या उपक्रमांतील सहभाग आदींचा समावेश होता. बाजार समित्यांसाठी २०० गुणांचे, तर खाजगी बाजारांसाठी २५० गुणांचे मूल्यांकन पद्धत ठरवण्यात आली होती.

Harshawardhan Sapkal : काँग्रेसचे पुन्हा एकदा ‘संविधान बचाव’!

या मूल्यांकन प्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील बाजार समित्यांमध्ये आरोग्यदायी स्पर्धा निर्माण करणे आणि शेतकऱ्यांना अधिक उत्तम सुविधा मिळवून देणे हा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक, सुटसुटीत आणि आधुनिक सेवा मिळण्यासाठी बाजार समित्यांनी अधिक सजगतेने कार्य करावे, असे आवाहन पणन संचालक विकास रसाळ यांनी केले आहे.