Election petitions will increase the difficulties Sajid Khan Pathan also included : निवडणूकीविरोधात याचिका दाखल; साजीद खान पठाण यांचाही समावेश
Nagpur विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजयी झाले. तर अकोला पश्चिम मतदारसंघातून साजीद खान पठाण विजयी झाले. या दोघांच्याही अडचणीत काहीशी वाढ झाली आहे. दोघांविरोघातही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
वडेट्टीवार यांच्याविरुद्ध स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार ॲड. नारायण जांभुळे यांनी याचिका दाखल केली आहे. तर अकोला पश्चिम मतदारसंघातून जिंकलेले काँग्रेस उमेदवार साजीद खान पठाण यांच्याविरुध्द भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे. वडेट्टीवार यांनी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर जांभुळे यांचा आक्षेप आहे. वडेट्टीवार यांनी ज्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले, तो स्टॅम्प पेपर त्यांच्या पत्नी किरण यांनी १८ ऑक्टोबर रोजी स्वतःच्या नावावर खरेदी केला.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी सांगितला वसुंधरेचं कर्ज फेडण्याचा उपाय !
वडेट्टीवार त्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करू शकत नाहीत. त्यामुळे स्टॅम्प कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे, असे जांभुळे यांचे म्हणणे आहे. अग्रवाल यांनी पठाण हे बुथवर अवैध मतदान झाल्यामुळे निवडून आले, असा आरोप केला आहे. तसेच, पठाण यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. जांभुळे हे स्वत: तर, अग्रवाल यांच्यातर्फे ॲड. रोहन मालविया बाजू मांडणार आहेत.
दरम्यान, आठ मतदारसंघात पराभूत उमेदवारांनी अगोदरच आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील आठ विजयी उमेदवारांच्या निवडणुकीला आव्हान देण्यात आले आहे. खरं तर यापूर्वीच याचिका दाखल करता आली असती. मात्र, पराभूत उमेदवारांना अचानक जाग आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एवढे दिवस महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार झोपले होते का, असा सवाल उपस्थित होत आहे.