NCP’s Kalash Rath Yatra in Amravati : राष्ट्रवादीची कलश रथयात्रा २९ व ३० एप्रिलला
Amravati निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी आपापल्या यात्रा काढून जनसंपर्क साधला. कुणाच्या वाट्याला यश आलं कुणाच्या वाट्याला अपयश. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याही यात्रेचा समावेश होता. राज्यात सत्ता आल्यानंतर अजित पवारांनी आणखी एका यात्रेची कल्पना मांडली. ही यात्रा राष्ट्रवादीतर्फे होत असली त्याला राजकीय स्वरुप देण्याचे टाळण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ६५व्या महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरात सुरु झालेल्या मंगल कलश रथयात्रेचा अमरावती विभागात २९ व ३० एप्रिल रोजी दौरा होणार आहे. गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीपासून सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या स्मारकापर्यंत ही रथयात्रा जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती विभागीय समन्वयक आ. संजय खोडके यांनी दिली.
Illegal sand smuggling : भंडाऱ्यात वाळू तस्करांचा हैदोस, अधिकार्यांवर हल्ला!
या रथयात्रेचा उद्देश राज्यभरातील थोर महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या माती व पाण्याचे मंगल कलशात संकलन करणे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या यात्रेमुळे गौरवशाली महाराष्ट्राचा इतिहास, सभ्यता, संस्कृती व परंपरेचे दर्शन घडवले जात आहे. गड-किल्ल्यांचे संवर्धन व थोर विभूतींच्या कार्याचा गौरवही यातून साधला जाणार आहे.
२६ एप्रिल रोजी अमरावतीतील शासकीय विश्रामगृहात रथयात्रेच्या स्वागतासाठी नियोजन बैठक झाली. बैठकीस आमदार सुलभा खोडके, आ. अमोल मिटकरी, विभागीय व जिल्हा पदाधिकारी तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
२९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता रथयात्रा गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर पूजन व प्रार्थनेनंतर सुरु होईल. त्यानंतर गाविलगड किल्ला (चिखलदरा), मुक्तागिरी जैन तीर्थ, संत गुलाबराव महाराज जन्मस्थान (माधान), श्री क्षेत्र रिद्धपूर, वलगाव येथील गाडगेबाबांचे निर्वाणस्थळ, कौंडण्यपूर येथील रुक्मिणीदेवीचे माहेर आदी ठिकाणांहून पवित्र माती व पाणी संकलित करून कलशात ठेवले जाईल.
Uddhav Thackeray : ‘ते’ घरातूनच निघत नाहीत, अन् निघालेच तर थेट परदेशात जातात !
सकाळी १०.३० वाजता ही यात्रा अमरावतीतील संत गाडगेबाबा समाधिस्थळ गाडगेनगर येथे दाखल होईल. येथे भव्य स्वागतानंतर रथयात्रा डॉ. पंजाबराव (भाऊसाहेब) देशमुख यांच्या पापळ गावाकडे मार्गस्थ होईल. दुपारी २ वाजता पापळ येथे नियोजित कार्यक्रम संपन्न होईल.