Breaking

Shock for Congress in Balapur : बाळापूरमध्ये काँग्रेसला धक्का !

Balapur Taluka Vice President joins BJP Congress suffers setback in Balapur : तालुका उपाध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश

Akola विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी अकोला जिल्ह्यातील विविध पक्षांत राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. त्याचा प्रत्यय बाळापूरमध्ये नुकताच आला आहे. काँग्रेसचे बाळापूर तालुका उपाध्यक्ष सहदेवराव ठाकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अकोला पश्चिम वगळता जिल्ह्यात कुठे यश मिळाले नाही. बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे नितीन देशमुख यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र काँग्रेसने त्यांना या मतदारसंघात कितपत मदत केली. हा संशोधनाचा विषय आहे. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे प्रमुख नेते नातिकोद्दीन खतिब यांनी काँग्रेसला रामराम केला. आणि वंचित बहुजन आघाडीचा हात धरला होता.

CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde : तुमच्या वाहनाला ‘फास्ट टॅग’नसेल तर लाऊन घ्या, कारण..

त्यांना वंचित बहुजन आघाडीने विधानसभेचे तिकीट देऊन निवडणूक लढवली होती. पण हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. त्यानंतरही काँग्रेसची गाडी रुळावर आलेली नाही. पक्षातील अंतर्गत खदखद सुरूच आहे. त्याचा परिपाक म्हणून अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. बाळापूरचे काँग्रेस उपाध्यक्ष सहदेवराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

बाळापूर काँग्रेसचे उपाध्यक्ष सहदेवराव ठाकरे ह्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वतःहून त्यांनी प्रवेश घेतला, असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ !

काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच
बाळापूर काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा करणारे पदाधिकारी तोंडघशी पडले आहेत. आधी माजी आमदार नातीकोद्दिन खतीब यांनी पक्ष सोडला. त्यानंतर वाडेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकार यांनी काँग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर काँग्रेसला बाळापुरमध्ये बसलेला तिसरा धक्का म्हणजे बाळापूर काँग्रेसचे उपाध्यक्ष सहदेवराव ठाकरे हे आहेत.