The police turned the road roller on the silencer of the bullet Police crackdown on bullet drivers bursting firecrackers : फटाके फोडणार्या बुलेटचालकांना पोलिसांचा दणका
Nagpur Police : नव्या स्वरूपातील बुलेटचे आकर्षण तरुणाईला भुरळ घालणारे ठरले आहे. मात्र, बुलेट चालविण्यापेक्षा फटाके फोडण्याकडे तरुणाईचा कल अधिक वाढला आहे. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फटाके फोडणे. सायलेंसरमधून आग काढणे. असे प्रकार होत असतात. बुलेटच्या फटाक्यांमुळे इतर वाहन चालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. पण पोलिसांनी अशा फटाके फोडणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. बुलेटचे सायलेंसर काढून त्यावरून रोलर फिरवला आहे. त्यामुळे बुलेटचालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
मंगळवार, दि. ७ जानेवारीला पोलिसांनी ही मोहिम राबविली. ४१ बुलेट चालकांना ताब्यात घेतले. बुलेटचे सायलेंसर काढून त्यावर रोड रोलर फिरविला आणि ते नष्ट केले. एवढेच काय तर त्यांच्यावर प्रत्येकी दिड हजार रुपये दंड ठोठावला. सायलेंसरचे अडिच हजार रुपये आणि दिड हजार रुपये दंड असा एका बुलेटचालकाला चार हजाराचांचा फटका बसला.
Rajendra Shingne : आमदार सिद्धार्थ खरात माझ्या गॅरंटीचा माणूस
शोरूममधून बुलेट खरेदी केल्यानंतर काही तरुण मेकॅनिककडे जाऊन त्यात आवश्यक ते बदल करून घेतात. चालती गाडी बंद करून पुन्हा चालू केल्यानंतर मोठा आवाज होतो. असा आवाज केवळ बुलेटमध्येच निर्माण होऊ शकतो. बुलेटने फटाके फोटण्याचे हे प्रकार वाढले आहेत. आवाजामुळे इतरांना त्रास होतो. तसेच अचानक आवाज झाल्याने समोरचा वाहनचालक दचकतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकाराचे गंभीर्य ओळखून नागपूर पोलिसांनी नवा फंडा शोधून काढला. फटाके फोडणार्या ४१ बुलेटचालकांवर कारवाई केली. त्यांच्यावर प्रत्येकी दिड हजार रुपये दंड ठोठावला. तसेच वाठोडा डंपिंग यार्ड येथे सर्व ४१ सायलेंसरवर रोड रोलर चालवून ते नष्ट केले. याशिवाय ज्या चालकाकडे कागदपत्रे नव्हती, ज्यांनी सायलेन्सरमध्ये बदल करून घेतला अशा बुलेट ठाण्यात थांबविण्यात आल्या आहेत.
रोलरने दारूसाठा नष्ट
परिमंडळ चार अंतर्गत दारूबंदीचे एकूण ८८ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या जप्त मुद्देमालातील एकूण १५८० दारूच्या बाटल्या नष्ट करण्यात आल्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास डंपिंग यार्ड वाठोडा येथे दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर चालविण्यात आले. यावेळी नागरिकांची गर्दी होती.