Breaking

Eknath Sinde Shiv Sena : काल पक्षात आले, आज कार्याध्यक्ष झाले!

Sumukh Mishra is new Shiv Sena working president of Nagpur : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कृपा, शिवसैनिकांना धक्का

Nagpur राजकारणात कधी काय होईल, सांगता येत नाही. कार्यकर्ते तर सदैव विचित्र घडामोडींसाठी सज्ज असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या नागपुरातील कार्यकर्त्यांना असाच धक्का दिला आहे. अगदी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी थेट कार्याध्यक्ष केले. एकेकाळचे एनएसयूआयचे माजी अध्यक्ष सुमुख मिश्रा यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.

मिश्रा यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले. शिंदेसेनेत प्रवेश करताच सुमुख मिश्रा यांना कार्याध्यक्ष करण्यात आले. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी मिश्रा हे काँग्रेसच्या एनएसयूआयचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पक्ष वाढीसाठी आपली ताकद पणाला लावली होती. देशातील विविध भागांत संघटनवाढीसाठी काँग्रेसकडून त्यांना जबाबदारी देण्यात आली होती.

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री म्हणतात, आपण तर मध्यप्रदेशलाही मागे टाकले!

विशेषत: नागपूर विद्यापीठातील त्यांची आंदोलने चांगलीच गाजली होती. नागपूरमध्ये पक्ष संघटन बळकट करण्यासाठी संपूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र मिश्रा यांच्या नियुक्तीमुळे शिंदेसेनेतील अनेकांचे तोंड कडू झाले आहे. इतक्या काळापासून शिवसेना व एकनाथ शिंदेंसोबत असतानादेखील बाहेरून आलेल्या मिश्रा यांना अशा पद्धतीने कार्याध्यक्ष करणे ही न पटणारी बाब असल्याचे मत काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Chandrashekhar Bawankule : सहा एकर जागेत शंभर खाटांचे रुग्णालय!

दरम्यान, मिश्रा यांनी नागपुरात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. शिंदेसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालत आहे. मुळात हा पक्ष त्यांच्या विचारांवर चालत आहे. पक्ष केवळ सामान्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. नागपूरसारख्या मोठ्या शहराची जबाबदारी माझ्यावर सोपवली याचा मला अभिमान आहे. मी पूर्ण जिद्दीने नागपुरात शिंदेसेनेचे संघटन मजबूत करेन व आगामी निवडणूकीत शिंदेसेनेला यश मिळवून देईन, असा दावा मिश्रा यांनी केला.