Breaking

Scheme For Farmers : मुनगंटीवार म्हणाले, अॅग्रीस्टॅकचे लाभ मिळवा, ‘फार्मर आयडी’ बनवा !

 

Sudhir Mungantiwar said, get the benefits of Agristack, make a ‘Farmer ID’ : शेती आणि शेतकऱ्यांना डीजिटल करायचेय

Chandrapur : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यात अॅग्रीस्टॅक ही योजना अत्यंत महत्वाची आणि प्रभावी आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमीनीच्या नोंदी, पीक उत्पादन, बाजारपेठेतील संधी आणि शासकीय योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती डिजिटल पद्धतीने एकत्रित केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनो तात्काळ ‘फार्मर आयडी’ बनवा, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

यासंदर्भात माहिती देताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू-संदर्भीकृत (जिओ रेफरन्स लॅंड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे. त्यातील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेतांची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येत आहे.

Kerala Lottery : गोव्याच्या सुपुत्राचे महाराष्ट्राशी असलेले भावनिक नाते उल्लेखनीय !

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळावा, याकरिता फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. फार्मर आयडी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा, प्रशिक्षण आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या संसाधनांसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या संसाधनांसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

Tiranga Yatra : मुनगंटीवारांच्या नेतृत्वात बल्लारपुरात दिसले ७ किलोमीटर लांब तिरंग्याचे विहंगम दृष्य !

कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभागरिता शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासठी अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी १५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप यासाठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सीएससी, कृषी विभाग किंवा क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी, असेही आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी केले आहे.

Sudhir Mungantiwar : ‘त्या’ घटनेने मुनगंटीवारांचे मन हळहळले, कुटुंबीयांना मिळवून देणार प्रत्येकी ५ लाख !

ॲग्रिस्टॅक योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे..
– शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केल्यामुळे अनुदान, पीक विमा, कर्ज आणि अन्य योजनांचा लाभ सहज मिळतो.
– हवामान अंदाज, माती परीक्षण आणि पीक उत्पादनाच्या सुधारित पद्धतींबाबत माहिती मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढते.
– शेतकऱ्यांना बाजार भावाची अद्ययावत माहिती मिळते, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे थेट विक्री करण्याची संधी मिळते.
– थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनुदान आणि आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते.
– विविध योजनांच्या लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज नसते, कारण त्यांची सर्व माहिती एकाच डिजिटल डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवली जाते.
– पीक विमा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या योजनांचा लाभ सहज मिळतो, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून निघते.