Chhagan Bhujbal said Devendra Fadnavis had insisted during the first cabinet : मी भाजपचा नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री
Nagpur : मला मंत्री बनवण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची होती. खरं तर पहिल्या मंत्रिमंडळ गठनाच्या वेळीच फडणवीसांनी मला मंत्री बनवण्यासाठी आग्रह धरला होता. पण त्यावेळी आमच्या पक्षाने जे ठरवले होते, तेच झाले. पण आता ती राहिलेली गोष्ट पूर्ण झाली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीदेखील प्रयत्न केले, असे राज्याचे नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
एका विवाह समारंभासाठी भुजबळ आज (२३ मे) नागपुरात आले होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काही लोक आजही टीका करतात. पण मला त्यांना सांगायचे आहे की मी भाजपचा नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) मंत्री आहे. कुणाला मंत्री करायचे, हे पक्ष ठरवत असतो. ज्यावेळी आम्ही भाजपसोबत नव्हतो आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होतो. त्याच वेळी माझी केस डिसक्वालीफाय झाली होती. ८० पानांचा निकाल आला आणि माझी मुक्तता झाली.
NCP Ajit Pawar : विदर्भातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसली कंबर!
महाराष्ट्र सदन फाईव्ह स्टार दर्जाचं बनलं आहे. त्याच्या कंत्राटदाराला एक पैसाही सरकारने दिला नाही. त्यानेच मुंबईत आरटीओचे फाईव्ह स्टार ऑफीस बनवले. गेस्ट हाऊस आणि काही अधिकाऱ्यांची घरे बनवली आहे. त्याला अजूनही पैसै मिळालेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने विचारले की, भ्रष्टाचार तर कुठेच दिसत नाहीये. त्यानंतर माझी केस बरखास्त झाली. पण अजूनही काही लोक कमेंट्स करत असतात. त्यांना मला हे सांगायचे आहे, असे मंत्री भुजबळ म्हणाले.