People’s republican party : केवळ घोषणा पुरेशा नाहीत, मनपा निवडणुकीत जागाही द्या

Jogendra Kawade party hoping more seats in NMC elections : कवाडेंच्या पक्षाला महायुतीकडून अपेक्षा, आक्रमक पवित्रा घेणार

Nagpur आंबेडकरी जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी केवळ घोषणा पुरेशा नाहीत. आम्हाला नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सन्मानाची वागणूक हवी. त्यासाठी निर्णायक जागा आमच्या वाट्यावा याव्यात, अशी अपेक्षा प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टीने दिला आहे.

आगामी मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पिपल्स रिपब्लिकन पार्टीकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीने पीरिपाला सन्मानित व निर्णायक जागा द्यावा; तरच राज्यातील आंबेडकरवादी जनतेचा विश्वास टिकेल. अन्यथा ही चळवळ उभ्या राजकीय यंत्रणेला प्रश्न विचारू शकते, असा इशारा पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांनी महायुतीला दिला.

Collector Office : आता लोक केंद्रांवर नाही, तर सेतू केंद्र गावांत जातील !

रविभवनमध्ये आयोजित पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. याच्या अध्यक्षस्थानी पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जवळ येत असताना, संघटनात्मक बळकटी, प्रचार योजना आणि आंबेडकरी समाजाशी संवाद वाढविणे या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत संघटनात्मक विस्तार, युवकांचा सक्रिय सहभाग, गावपातळीवर जनजागृती मोहिमा, ‘संविधान घराघरांत’ ही कल्पना, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि युवा प्रशिक्षण शिबिरे यावरही चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता संपर्क यात्रा, सोशल मीडियावर हॅशटॅगच्या माध्यमातून जनप्रबोधन यांवर चर्चा करण्यात आली. तसेच निधी संकलनासाठी ‘उद्योगपती संवाद सत्रे’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sant Gajanan Maharaj : पाऊले चालती पंढरीची वाट! ७२५ किमीचा ३३ दिवसांचा भक्तिप्रवास

यावेळी पीरिपाच्या महिला आघाडीच्या नेत्या प्रतिमाताई जयदीप कवाडे, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, शहराध्यक्ष कैलाश बोम्बले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, राष्ट्रीय मजदूर सेना विदर्भ प्रदेशाध्यक्ष विजय पाटील, पूर्व विदर्भ महिला अध्यक्षा सुचिताताई कोटांगळे प्रामुख्याने उपस्थित होते.