Clashesh between Rane brothers : निलेश राणेंना नितेश यांचे पोस्टनेच प्रत्युत्तर, मिटकरी म्हणतात बिघाडी नको!
Mumbai : सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. त्यावर निलेश राणे दुखावले. त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत बंधू नितेशला सबुरीचा सल्ला दिला होता. त्याला त्यांनीही अशीच पोस्ट करत ‘तुम्ही तर टॅक्स फ्री’ असे उत्तर देताच ती पोस्ट ‘डिलिट’ केली. दरम्यान या वादात अमोल मेटकरी यांनी बिघडी नको असा सल्ला दिला आहे.
शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत संघर्षाच्या मुद्द्यावरुन नितेश आणि निलेश राणे या दोन बंधूंमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांना भाजपच सर्वश्रेष्ठ आहे, असे ठणकावून सांगणाऱ्या नितेश यांना आमदार निलेश राणे या बंधूनी सबुरीचा सल्ला दिला होता. त्यावर नितेश यांनीही उत्तर दिले होते. नंतर निलेश राणे यांनी आपले ट्विट डिलिट करुन टाकले. यामुळे राजकीय वर्तुळात नितेश आणि निलेश राणे यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरु झाली.
Split in Shinde Sena : दोन दिवसांत दुसरी बैठक, शिंदे गट अस्वस्थ
नितेश ने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण, आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. अशी पोस्ट
निलेश यांनी केली. यावर नितेश यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आणि, निलेशजी तुम्ही ‘टॅक्स फ्री’ आहात, असा रिप्लाय दिला. यानंतर निलेश राणे यांनी आपली पोस्ट डिलिट केली होती.
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच नितेश यांनी दिली. कुणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश म्हणाले होते. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्हा नियोजन समितीमधील निर्णयांवरुन भाजप आणि शिवसेनेत वाद सुरू झाले आहेत. तिथेच या वादाची ठिणगी पडली.
Azad Maidan : सेवानिवृत्त पोलिसांचे आझाद मैदानावर आंदोलन, शासनाने घेतली दखल !
नितेश राणे हे मंत्री आहेत, हिंदू धर्मरक्षक म्हणून त्यांचा चेहरा प्रसिद्ध आहे. त्यांनी रामायणाचा भाग अंगीकारला पाहिजे. भावाने दिलेला सल्ला वडिलांच्या सल्ल्यानंतर सर्वोच्च मानला जातो. निलेश यांनी नितेश यांना सल्ला दिला. आपल्या बोलण्यातून महायुतीत बिघाडी होणार नाही, याची काळजी घ्यावी. निलेश राणे यांचा हा सल्ला नितेश यांनी मानावा. असे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.